Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना आसोदा रोड परीसरात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील तलवार  हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  सविस्तर माहिती अशी की, शहरातील जुना आसोदा रोड काशीनाथ पाटील नगर जवळ संशयित आरोपी संजय सदाशिव कोळी (वय-४१) रा. जुना आसोदा रोड जवळ हा हातात धारदार तलवार घेवून आरडोओरड करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, पो.हे.कॉ. अनिल देशमुख, कमलाकर बागुल, चालक विजय चौधरी…

Read More

जळगाव प्रतिनिधी : शहरातील टीव्हीएस शोरूम मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरयाप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात करण्यात आला आहे शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कोंबडी बाजार चौकात योगेश अशोक चौधरी (वय-४५) रा. गणपती नगर जळगाव यांचे पंकज टीव्हीएस शोरूम आहे. याठिकाणी अज्ञात चोरट्याने सोमवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गच्चीवरील चायनल गेटच्या लिप्टच्या माध्यमातून कुलूप तोडून आत प्रवेश करत शोरूमच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले. लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेला. दरम्यान,  लोखंडी लॉकरमध्ये रोकड असल्याचा अंदाजानुसार त्याने लोखंडी लॉकर तोडले. परंतू त्यात…

Read More

जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील अनेक गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळासह मुसळधार पावसाने तडाखा दिला असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून शासकीय पातळीवर तात्काळ मदत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असून ते सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तहसीलदार अरूण शेवाळे हे आपल्या सहकार्‍यांसह आज पहाटेपासूनच आपत्तीग्रस्त गावांना भेटी देत असून त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा, तोंडापूर व ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात  प्रामुख्याने…

Read More

बहुळा ९, हतनूर ६ तर बोरी प्रकल्पाचे ७ गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून विविध प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत असल्याने मध्यम लघूप्रकल्प पातळीत बर्‍याच प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर प्रकल्पांसह अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ११२ मि.मी पावसाची नोंद असून १८.६४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.  गिरणा प्रकल्पात ०.५३ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४७.८५ तर वाघूर प्रकल्पात ७४.९१ टक्के साठा आहे. जिल्ह्यातील ९६ मध्यम लघू व ३ मोठया प्रकल्पात सरासरी ५२.४१ टक्के उपयुक्त साठा आहे. मध्यम प्रकल्पापैकी पाचोरा…

Read More

जळगाव ;- ​‘‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझा सर्वोच्च पुरस्कार!’’ मानणाऱ्या श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सवर भूमिपुत्र आणि सहकाऱ्यांसह पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू केली. कोरोना पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे शासकीय नियम पाळून प्रातिनिधीक स्वरूपाचा छोटेखानी पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भूमिपुत्रांशी बांधिलकी असणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन तसेच कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व सौ. शोभना जैन यांनी पोळ्याच्या सोहळ्यावेळी तेथेच मांडलेल्या सप्तधान्यासह बैल जोड्यांचे विधीवत पूजन करुन बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सौ. ज्योती जैन व सौ. शोभना जैन यांच्या हस्ते पाच सालदार…

Read More

जळगाव ;- एका किराणा दुकानांतून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल लांबविण्याची घटना रामेश्वर कॉलनी परिसरातील तुळजामाता नगर येथे घडली होती . एमआयडीसी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून ती जणांना पहूर येथून अटक केली . विशाल मुरलीधर दांभाडे, योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके रा. रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या तिनही संशयित आरोपींची नावे आहेत. तुळजामाता नगरात सुरेश तानाजी पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह राहतात . त्याच्या घरातच सुनंदा किराणा स्टोअर्सचे दुकान शनिवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुरेश पाटील यांनी दुकानातील दागिणे व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान…

Read More

जळगाव ;- महापालिकेत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात १५ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लोकशाही दिनाचेसकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात नगररचना विभाग -३, पाणीपुरवठा विभाग १, आरोग्य विभाग १, सार्वजनिक बांधकाम विभाग २, विद्युत विभाग २, अतिक्रमण विभाग १ तर नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त ५ अशा एकूण १५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता सुनील साळुखे, विद्युत विभाग उपभियांता एस. एस. पाटील, प्रभाग…

Read More

जळगाव ;- सामाजिक चळवळीचे ऊर्जा केंद्र असलेल्या नागपूर मधील अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रचंड घोषणा देत जोरदार निदर्शने केली. नागपूर येथील अंबाझरी परिसरात असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र १८ एकर विस्तीर्ण जागेवर आहे. देशभरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या या केंद्रात सुसज्ज ग्रंथालयासह भव्य सभागृह होते. मात्र, जातीय विद्वेष मनात बाळगणाऱ्या संघ धार्जिण्या नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त केले. यामुळे आंबेडकरी समाजासह‌ सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक…

Read More

जळगाव ;- गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय परिसरात आज सर्जाराजाचा पोळा ह्या सणानिमित्‍त बैलजोडींचे पूजन करत त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बळीराजाचा शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला तसेच पोळा सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जमिनीतून उत्पादन घेण्यासाठी बळीराजासोबत सर्जाराजा देखील राबत असतो, या सर्जाराजाचे महत्व अधोरेखित करणारा पोळा हा सण यंदा ६ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशन येथे साजारा करण्यात आला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी आपल्या बैलजोडींची सजावट करत त्यांना पूजनाच्या ठिकाणी आणले होते. गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांनी बैलजोडीचे पूजन केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, कृषी महाविद्यालयाचे परिसर…

Read More

जळगाव ;- – ५ सप्टेंबर, भारतरत्न तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून सन १९६२ पासून साजरा करण्यात येतो. एका राष्ट्रपतींचा वाढदिवस तो मूलत: शिक्षक असल्यामुळे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो, या भारतातील फारच सुसंस्कृत व दर्जेदार घटनेचे जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी (हेडगर्ल)व्रजेषा सेठ व(हेडबॉय) आदित्य कुलकर्णी ह्या विद्यार्थ्यांनी कार्याक्रमाची रूपरेषा मांडली. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.शाळेचे उपप्राचार्य श्री.दिपक भावसार यांनी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी,सन्माननीय पालक,विद्यार्थी तसेच उपस्थितांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते डॉ.…

Read More