जळगाव : प्रतिनिधी गांजाची केस न करण्यासाठी तसेच जप्त दुचाकी सोडण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार शिवाजी बाविस्कर यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. चोपडा शहरातील बसस्थसानक परीसरात शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील ३२ वर्षीय तक्रारदार यांचे चुलत भाऊ व त्याच्या मित्रांना 23 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता तीन पोलिसांनी सत्रासेन रस्त्यावर दुचाकीवरून पकडले होते. पोलीस ठाण्यात चला, तुमच्यावर गांजाची कारवाई करायची आहे, अशी दमदाटी करून आम्हाला प्रत्येकी 75 हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत आरोपी पोलिसांनी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून पहाटेच्या सुमारास 30…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
एरंडोलवर शोककळा : तीन तरुण दुर्देवाने नदीत बुडाले ! श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी या दिवशी अनेक ठिकाणाहून कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे अशीच कावड यात्रा एरंडोल शहरातून देखील निघाली ही यात्रा रामेश्वर या तीर्थस्थळावर गेली असता या ठिकाणी तीन तरुण तापी नदीच्या संगमावर पोहायला गेले असता तीन तरुणाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातून आज पार्टीच्या सुमारास कावड यात्रा रामेश्वर या ठिकाणी जाण्यास निघाली होती ही यात्रा दुपारच्या सुमारास रामेश्वर येथे पोहोचले या ठिकाणी तापी नदीचा संगम असल्याने काही तरुण पोहायला गेले असता त्यात सागर शिंपी अक्षय शिंपी व पियुष शिंपी या…
धरणगाव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यायातील भ्रष्ट कारभाराला करणार उघड जळगाव जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या घटनाबाह्य व भ्रष्ट कारभारासंदर्भात प्रा.डॉ.प्रविण बोरसे यांनी आज पासून जळगाव शहरातील सह संचालक उच्च शिक्षण विभाग जळगाव यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केल्याने जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि, धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यायातील विविध घटनाबाह्य व भ्रष्ट कारभारासंदर्भात जानेवारी २०२० मध्ये महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रविण बोरसे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पुराव्यासह केलेल्या तक्रारी संदर्भात प. रा. हायस्कूल व्यवस्थापन मंडळ, धरणगाव आणि जळगाव विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने तत्कालीन प्राचार्य बिराजदार यांना चौकशी समितीने दोषी ठरवलेले असतानाही…
अडावद पोलीस स्थानकात दि. १३ रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील ५ संशयित आरोपीच्या बाबत गोपनीय माहिती अडावद पोलिसांनी मिळाली असता त्यांनी ११ तलवारी, २ धारदार गुप्त्या यासह ५ संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि १३ ऑगस्ट रोजी गुरन 174/2023 आर्म ॲक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात संशयित आरोपी 1) सागर भगवान महाजन वय 22, रा अडावद 2) राहुल लक्ष्मण ठाकरे वय 19, रां सुटकार 3) राज प्रमोद ठाकुर वय 21 रा लोणी ता चोपडा 4) चिरंजीव रवींद्र भोई वय 19,रा अडावद 5 ) मयूर रामेश्वर कोळी वय 20 रा अडावद याच्याकडून एकूण 11 धारदार तलवारी…
धरणगाव तालुक्यात मोठी खळबळ धरणगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील विहीर फाटा येथे हॉटेल अंजनी गार्डनच्या मागच्या बाजूला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती परीक्षा विधीन अधिकारी आप्पासाहेब पवार यांना मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धरणगाव पोलीस सांच्या सहकार्याने आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहा टाकून चौघांना अटक करून अठरा हजार रुपयांची रोकड चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी तथा परिविक्षा दिन अधिकारी आप्पासाहेब पवार यांना गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल मोती पवार सत्यवान पवार शैलेश सूर्यवंशी नयन पाटील प्रवीण पाटील भूषण सपकाळे तुषार जोशी जितेंद्र सोनवणे हिरालाल…
पोलिसात गुन्हा दाखल… पारोळा ;- तालुक्यातील एका गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शौचालयाला गेली असता एकाने तिला अडवून तिच्यावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १० रोजी उघडकीस आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तालुक्यात एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलगी हि १० रोजी सायंकाळी शौचालयाला जात असताना आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल (मोरे ) पारोळा जि जळगाव याने तिला अडवून तिच्यावर जबरदस्ती करून तिने विरोध केला असता आरोपीने…
काही मिनिटात पोलिसांनी घेतले गोळीबार करणाऱ्याला ताब्यात : असा लावला छडा ! शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या भांडणातून झालेल्या वादातून एकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याची घटना काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी स्वप्नील उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (राजपूत, 25, गजानन पार्क, रा.कुसुंबा, ता.जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताला केवळ अर्ध्याच तासात मन्यारखेडा फाट्याजवळून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत मुद्देमाल बंदूक व काडतूससह अटक केली आहे. संशयिताला लगेच अटक करण्यात यश आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांचे पोलीस अधीक्षकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे. आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी १०…
जळगाव – जळगाव शहरातील एमआयडीसी परिसर सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे जळगाव शहर हादरले असून शहरातील कायदासुव्यवस्थे बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना जुन्या वादातून प्रभा पॉलिमर सेक्टर या ठिकाणी आली असून घटनेनंतर संशयित आरोपी हा इतर दोघांसोबत फरार झाला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक मारेकऱ्यांच्या मागावर असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशय आरोपीला पोलिसांनी अर्ध्या तासातच पकडले आहे. जळगाव शहरामध्ये काही दिवसापूर्वी गोळीबार झाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. पुन्हा एकदा गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे शहर हादरले आहे. या घटनेत आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांच्या फिर्यादनुसार…
चाळीसगाव : प्रतिनिधी तहसील कार्यालयाच्या लिपिकाला अडीच हजारांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दीपक बाबूराव जोंधळे , वय- 47 फौजदारी लिपिक (दंडप्र) तहसील कार्यालय, चाळीसगाव जि. जळगाव, रा. शास्त्रीनगर प्लॉट नंबर 16 कापड मिल मागे चाळीसगाव जि. जळगाव. असे संशयिताचे नाव आहे. यातील तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना…
जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका नराधमाने अत्याचार करीत मृतदेह गोठ्यात टाकल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्वप्नील उर्फ सोन्या पाटील, वय १९, ता. भडगाव असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख,यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते.त्यावरुन स्थनिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश…

