Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील चित्रा चौकात बाजारात आलेल्या शेतकऱ्यांची दुचाकी चोरून नेलचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात माहिती अशी की, प्रदीप शामराव देशमुख (वय-६१) रा. हरी ओम नगर, जुना कानळदारोड, शिवाजी नगर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीटी २११९) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास प्रदीप देशमुख हे चौत्रा चौकात दुचाकीने कामानिमित्त आले. चौकातील विशाल ईलेक्ट्रिक दुकानासमोर पार्किंग करून लावली होती. अवघ्या १० मिनीटात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी पार्किंगच्या ठिकाणाहून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। पुणे शहरातील कोथरूड पोलीस ठाण्याचे ७० जणांचे पथक आज जळगावात दाखल झाले आहे. मविप्रचे अ‌ॅड. विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या आता अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तविण्यात आले आहे. ७० जणांचे एकुण पाच पथकाची निर्मिती केली असून कसून चौकशी सुरू आहेत. आज जळगाव शहरातील निलेश रणजित भोईट, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईट, प्रा. एल.पी. देशमुख आणि प्रमोद काळे अश्या पाच जणांच्या घरी पोलीसांनी धाडी टाकून सकाळपासून चौकशी सुरू आहेत. दरम्यान मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल…

Read More

जामनेर प्रतिनिधी | ”ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले.अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले,त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्या विरूध्द आंदोलने केली.आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ठाण्याच्या उपचाराची गरज आहे”,असा पलटवार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केला आहे. तर ”राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी” असे खुले चॅलेंज देखील त्यांनी केले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे नेते आ. गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर मोक्काच्या धाकाने त्यांना कोरोना झाला असावा असा संशय व्यक्त केल्याने…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन ; सर्वांगीण विकासाची दिली ग्वाही लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी २१ कोटी रूपयांची पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली असून याचे लवकरच भूमिपुजन करण्यात येणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. पाळधी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करतांना ना. पाटील यांनी पाळधी गावासोबत असणारे आपले ऋणानुबंध व्यक्त करत विकासकामांच्या माध्यमातून यामधून उतराई होण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केले. दरम्यान, आज पालकमंत्र्यांचे आज मोटारसायकल रॅलीद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. तर मोटारसायकलवर स्वार होऊनच त्यांनी विविध विकासकामांच्या भूमिपुजनाला हजेरी लावली. याच कार्यक्रमात त्यांचा मनसेचे जिल्हाध्यक्ष…

Read More

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याच चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.नवीन नियमावली नुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यूमैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंदशाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार. सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरुपूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं…

Read More

जळगाव प्रतिनिधी । आईस्क्रीमची ऑर्डर घेण्याच्या कारणावरून दुकानदार व सेल्समन यांच्यात तुफान हाणामारी झाली. यात एकमेकांना मारहाण करून दुकानाचे नुकसान केले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्परविरोधात गुन्हे दाखल केले आहे. सविस्तर माहिती अशी की, उमेश शांतीलाल कुमावत (वय-३७) रा. रायसोनी नगर जळगाव हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या असे म्हणत वादाला सुरवात झाली. वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन दोघांनी एकमेकांला मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमकी दिली. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दोघांनी परस्पर विरुद्ध तक्रार दिल्यावरुन जळगाव शहर पोलिसात वेगवेगळे…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजीव गांधी नगरातील ४० वर्षीय विवाहीतेवर दारुच्या नशेत पतीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ७ जानेवारी रोजी घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, संगिता रमेश झेंडे (वय-४०) या राजीव गांधीनगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्याचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हा काल संध्याकाळी दारुच्या नशेत घरी आला. काहीएक कारण नसतांना वाद घालून पत्न संगिताला लोखंडी पट्टीने हल्ला चढवून खांद्यावर, डाव्या बरगडीवर, मनगटावर जखमी करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. जखमीच्या तक्रारीवरुन संशयीत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटिल करत आहेत.

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना मदत वाटप धरणगाव प्रतिनिधी : आज अत्यंत विपरीत स्थिती असली तरी कुणी जीवन संपविण्याचा प्रयत्न करता कामा नये. दिवस हे परिक्षा घेणारे आणि संघर्षाचे असले तरी राज्य शासन हे शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत १५ महिलांना प्रत्येकी २० हजार रूपयांच्या सहायता धनादेशाचे वितरण आणि आत्महत्याग्रस्त ३ शेतकर्‍यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये शासकीय मदतीने वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : शासकिय विश्राम गृह धरणगाव येथे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माल्यार्पण प्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. तत्पुर्वी, अधिकृत पत्रकार संघाचे अधिकृत तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष व सदस्य ऍड.वसंतराव भोलाने, लक्ष्मण माळी, कडू महाजन (तरुण भारत), धर्मराज मोरे (पुण्यनगरी), भगीरथ माळी (जागर जनस्थान), बी.आर.महाजन (दिव्य मराठी), जितेंद्र महाजन (लोकनायक), आर.डी. महाजन (लोकमत), अविनाश बाविस्कर (LIVE TREND), बाळासाहेब प्रभूदास जाधव (सामना),…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथे ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून ‘तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते या स्पर्धेत म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे. ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून जळगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत म्हसावद येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेच्या दुसऱ्या गटात इयत्ता दहावीतील सेजल संजय झवर हिने द्वितीय तर उच्च माध्यमिक विभागातील तिसऱ्या गटात बारावीतील प्रतिभा ज्ञानेश्वर पाटीलने प्रथम तर प्रियंका ज्ञानेश्वर मराठेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सर्व विजयी स्पर्धकांचे संस्थेचे चेअरमन डॉ.केदार थेपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनार, उपमुख्याध्यापक श्री.बच्छाव, पर्यवेक्षक श्री.भंगाळे, ज्यू.कॉलेजमधून…

Read More