लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविली आहे. जळगाव शहर- १३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ -२५, अमळनेर-२, चोपडा-२५, यावल-१, जामनेर-१, रावेर-४, मुक्ताईनगर-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३८६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ५५२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, प्रताप विद्या मंदिर चोपडा 1997-98 तुकडी क बैच च्या विध्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा मुख्याध्यापक आणि माजी वर्ग शिक्षक सर यांच्या उपस्थितीत प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे दिनांक 09 जानेवारी 2022 रोजी पार पडला. कार्यक्रमचे सत्कारर्मूर्ती मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सरांचे स्वागत माजी विद्यार्थीतर्फे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, यावेळी माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला अनेक शिक्षक भावुक झालेले दिसून आलेत विद्यार्थ्यांनीही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला स्नेहमेळावा सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सर, यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून. माजी शिक्षक डॉ.सुधीर चौधरी, माजी शिक्षक एस. बी…
जळगाव प्रतिनिधी । खोटेनगर परिसरातील घरासमोरून दुचाकी व डिक्कीतील लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, धिरज विश्वासराव पाटील (वय-४५) रा. गुरूदत्त कॉलनी, खोटेनगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ एडब्ल्यू ४३०६ ) क्रमांकाची मोपेड दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ते कामावरून आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी घराच्या पोर्चमध्ये पार्किंगला लावली होती. मोपोड गाडी असल्याने त्यांनी त्यांचा १५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप देखील दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होत. रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. दरम्यान…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सचिन सुरेश सपकाळे हे पत्नी रेणूदेवी सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी सचिन सपकाळे यांचा भाऊ विशाल सुरेश सपकाळे देखील कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सुरेश सपकाळे हा भाऊ सचिन सपकाळे यांच्या घरी येवून जुन्या कौटुंबिक वादातून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सुरेशने हातातील चाकू सचिनच्या डोक्यावर वार करून जखमी केले तर रेणूदेवी सपकाळे यांना डोक्याला मारहाण केली. दोघांवर जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचार…
पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील वृध्दाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, कैलास नथ्थु पाखले (वाणी) (वय-६८) रा. निंभोरा बुद्रुक ता. पाचोरा शनिवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात इलेक्ट्रीकचे किरकोळ काम करीत असतांना त्यांच्या हातालाच वायरचा स्पर्श झाल्याने वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते जागीच ठार झाले आहे. तातडीने त्यांना नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असत वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर)…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आवारात असलेल्या खुल्या भूखंडावर जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यासह लोकसहभागातून वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची उपस्थिती होती. लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह…
वेणुगोपाल झंवर यांची अध्यक्षपदी निवड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जेसीआय जळगाव सेंट्रलचा पदग्रहण सोहळा शहरातील शिरसोली रोडवरील सुरभी लॉन येथे रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी पार पडला. नूतन अध्यक्ष वेणुगोपाल झंवर यांनी मावळते अध्यक्ष श्रेणिक जैन यांचेकडून तर नूतन सचिव तुषार बियाणी यांनी मावळते सचिव भावेश जैन यांचेकडून पदभार स्वीकारला. जेसीआय जळगाव सेंट्रलची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी सुरभि लाव्नस येथे एका कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी झोन अध्यक्ष नंदलाल जयस्वाल, माजी राष्ट्रीय संचालक स्वरूप लुंकड यांचेसह आर्यन इको रिसॉर्टच्या संचालिका रेखा महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात खासदार…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : काळ आला होता पण वेळ आली नव्हती…शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला कळा सुरु…ग्रामीण भाग असल्याने कुटुंबीयांची धावपळ…मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती सुरु…महिलेच्या वेदनांनी आसमंत हादरले…रात्रीची बिकट वेळ…महिलेने चक्क जुळ्या बाळांना दिला जन्म… त्याचवेळी बाळांचेही शिशुरूदन सुरू…पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगातून अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे. केवलबाई साहिदास भिल (वय २६, रा.उखडवाडी ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची हि चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी २ मुली व २ मुले…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात आज दविसभरात १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण १७९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात -६४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-७३, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-२, धरणगाव-१, जामनेर-५, रावेर-२, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर -२, बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ४७३…
प्रतिनिधी प्रविण पाटील । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात नवीन बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते रविवार ९ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते कोनशिलाचेही अनावरण करण्यात आले. जळगाव शहरातील सर्वात मोठी पोलीस स्टेशन म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नाव समोर येते. याठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या संकल्पनातून बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. याचा उपयोग पोलिस कर्मचारी वर्गाला बंदोबस्त काळात मुक्काम कामी , पोलिस कर्मचारी बैठक, पोलिस पाटील बांधवांची बैठक या सभागृहाचा उपयोग होणार आहे. या सभागृहाचे रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण…

