लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथे आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून ग्रामस्थ आणि मुलीकडील कुटुंबियाने मुलाच्या कुटुंबांसह मुलीला मारहाण करत छळ केला. हा प्रकार धक्कादायक समोर आल्याने त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडीयात व्हायरल झाले आहे. आपल्यावर छळ होत असल्याची तक्रार मुलाकडील नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेट घेवून कारवाईचे निवेदन दिले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील तरूण व तरूणी हे सज्ञान असून त्यांनी १५ ऑगस्टला आंतरजातीय विवाह केल्यानंतर पारोळा पोलिसात हजर झाले. याठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई वडीलांना बोलाविले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी शशिकांत वारुळकर । जावेद हबीब याच्या तीव्र निषेध व्यक्त करत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन बुधवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नाभीक बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात व राज्यात एकीकडे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे ४२४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे तर दुसरीकडे जावेद हबीब नावाचा समाजकंटकांचे केस रचनेचे प्रात्यक्षिक दाखवतानाचे काही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे, अशा प्रकारे स्त्रियांच्या डोक्यावर थुंकून नराधम संपूर्ण स्त्री जातीचा अपमान करत आहे या घटनेचा सर्व नाभिक समाज बांधव तीव्र शब्दात निषेध करत आहे. अश्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात आज तब्बल २८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एक रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज १९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. आजच्या अहवालानुसार जळगाव शहर-८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-५, चोपडा-२२, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-०, पारोळा-५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २८५ रूग्ण आढळून आले आहे. या अहवालानुसार जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यातील रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ८९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २८०…
पाचोरा प्रतिनिधी । भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आज दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तात्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आज दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालया तर्फे मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतिमापूजन मा.नगराध्यक्ष सौ उषाताई वाघ व (अँड) वसंतराव भोलाने यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,उपनगराध्यक्षा कल्पना ताई महाजन,माजी नगराध्यक्षा सौ अंजलीताई विसावे,राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे,नगरसेवक सुरेश महाजन, नंदू पाटील,(अँड)संदिप पाटील, विनोद पाटील सर,प्रकाश पाटील, बाळासाहेब जाधव,राजेंद्र ठाकरे, दीपक महाजन,दिलीप बापू पाटील,नगराज पाटील,छोटू जाधव,व्ही टी माळी सर,वाल्मिक पाटील,विलास महाजन,प्रशांत येवले,राहुल रोकडे,सतीश बोरसे,योगेश पी पाटील,प्रथमेश सूर्यवंशी,भास्कर चव्हाण,मोतीलाल माळी,रघुनंदन वाघ,दीपक गायकवाड,संजय चौधरी आदी…
मुंबई वृत्तसंस्था । ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी एका विद्यार्थ्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. आपण दुकान चालवून कोरोनाचे सर्व नियम पाळणार असल्याचेही देखील पत्रात नमूद केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार असे विद्यार्थ्याचं नाव आहे. “ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात ४० विद्यार्थ्यांची संख्या असेल तर आठ ते दहाच विद्यार्थी त्यावर उपस्थित असतात. बाकी विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाइल नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. कधी लाईटच नसते. अशा स्थितीमध्ये…
प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलमध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी कोवीड लसीकरण शिबीराला बुधवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरूवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षण संस्थोचे अध्यक्ष एल.एच.पाटील यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण शिबीराला आरोग्यसेवक सलीम पिंजारी, ए.सी.पाटील, सुनिता सपकाळे, आशा वर्कर्स सरीता पाटील, जयश्री पाटील, मुख्याध्यापक जयश्री पाटील, शिक्षक दिपक सराफ, स्वाती पाटील, योगेश चव्हाण, लिपिक महेंद्र पाटील, भरत पाटील, संदिप पाटील, जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते. लसीकरण शिबीर यशस्वितेसाठी शाळेचे शिपाई प्रमोद मोरे, विजय पवार, संतोष वाघ, असलम मण्यार, रामचंद्र चव्हाण यांनी…
महामातांचे जीवन कार्य प्रेरणादायी ; पी.डी.पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील धानोरे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक सरपंच भगवान महाजन यांनी केले. या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील प्रसिध्द काँट्रॅक्टर भगवान महाजन होते. प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर आणि शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून गायत्रीबाई भगवान महाजन, उपसरपंच अशोक पाटील, ग्रा.पं. सदस्य हरी पाटील, राजाराम महाजन, वैजयंताबाई बाविस्कर सुरेखाबाई रोकडे, मायाबाई चांभार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता…
मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्यातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या होमगार्ड बांधवांच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत होमगार्डचे मानधन विहित वेळेत अदा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना विमा सुविधा आणि १८० दिवस नियमित स्वरूपात काम उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. होमगार्डच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्यात येईल, असे अश्वासन होमगार्ड यांना देण्यात आले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात तब्बत २२१ बाधित रूग्ण आढळून ओ आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्राकन्वये कळविले आहे. यात जळगाव शहर – ४३, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-१०७, चोपडा-३२, एरंडोल-०५, पारोळा-०२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण २२१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ६०७ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.…

