जळगाव प्रतिनिधी । गुरे चारण्याच्या कारणावरून कंडारी येथील एकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू शेख बाबु (वय-५४) रा. कंडारी ता.जि. जळगाव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू शेख हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवारी १३ जानेवारी रोजी राजू शेख यांच्या शेताच्या बांधावर भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे याने गुरे चारण्यासाठी सोडले होते. शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गुरे चारण्याबाबत विचारणा करण्यासाठी राजू शेख बाबु हे घरी गेले असता याचा राग असल्याने भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे आणि मयुर विश्वासराव सुर्वे रा.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
आता कानकोपऱ्यात मध्यरात्री “पोलीस दादा” पेट्रोलींग करणार लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव शहरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने धरणगाव पोलीस प्रशासनाने स्वखर्चाने शहरात ठिकठिकाणी आर एफ आय डी बसविण्यात आले. पोलीस कर्मचारी रात्रीची पेट्रोलिंग करत आहे की नाही याबाबत थेट पोलीस अधिक्षकांना माहिती समजणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे. धरणगाव शहरात अनेक दिवसांपासून बंद घर फोडण्याचे प्रकार समोर येत आहे. दाट वस्तीत कोणते घर बंद आहे हे बाहेरील व्यक्तीला कसे कळू शकते. काही ठिकाणी झालेल्या घटनास्थळी चारचाकी वाहने पोहचणे शक्य होत नाही त्यामुळे चोर हा अलर्ट राहतो. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून निष्कर्ष काढला की, शहरातील कानाकोपऱ्यात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील सोनवद परिसरात बेसुमार अवैध डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वनविभाग पोळ्या शेकून आपले पोट भरण्याचे काम सुरू असल्याची ओरड वृक्षप्रेमी आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. एकीकडे राज्य शासन आणि केंद्र शासन वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी भर देत आहे. यासाठी गावपातळीपासून ते शहरापर्यंत सर्वजण वृक्षलागवड मोहीम राबवित येते. प्रत्येकाने एक तरी झाड जगवावे असे आवाहन करत असतांना दुसरीकडे धरणगाव तालुक्यातील सोनवद व नांदेड परिसरात व्यापारींच्या मदतीने काहीजण डेरेदार वृक्षांची मोठ्याप्रमणावर कत्तल केली जात आहे. विशेष म्हणजे सोनवद आणि नांदेड परिसरातील शेताजवळील नाला आणि आडोश्यात मोठ्या लाकडांना जाळून त्याचा कोळसा तयार केला जात आहे. हा…
खेडी ते आव्हाणे मार्गावर बळीराजाने व्यक्त केली कृतज्ञता लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कुणा मान्यवराचा सत्कार हा एखादा कार्यक्रम, लहान-मोठे फंक्शन; निवास, ऑफीस, विश्रामगृह आदी ठिकाणी होत असल्याचे आपल्याला माहित आहे. मात्र भर रस्त्यात आणि तो देखील मंत्र्यांचा सत्कार झाल्यावर आपला विश्वास बसणार नाही. तथापि, ही बाब प्रत्यक्षात खेडी ते आव्हाणे या मार्गावर घडली. ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेती रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिल्यामुळे शेतकर्यांना आपल्या शेत-शिवारात जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचा थेट त्यांच्यामुळे तयार झालेल्या रस्त्यावरच सत्कार केला. शेतकर्यांचे प्रेम पाहून पालकमंत्री भारावले. तर परिसरात हा एकच चर्चेचा…
धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील सोनवद-पिंप्री गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सोनवद-पिंप्री गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी देखील कोरोना चाचणीची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गोपाल चौधरी यांनी केले आहे. दरम्यान माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. लवकरच मी कोरोणावर मात करेल व आपल्या सेवेकरिता हजर होईल. तरी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात असलेल्या हितचिंतक मित्र परिवार यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच लक्षणे आढळून आल्यास तातडीने करण्याची टेस्ट करून…
जळगाव प्रतिनिधी । शेड बांधणीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला गुरूवारी अटक केली होती. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी जिल्हा न्यायलयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर झालेले असून गोठ्याचे शेडच्या बांधणीचे काम सुरू करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात पंचायत समितीचे कनिष्ठ लिपीक वसंत पंडीत बारी (वय-५३) रा. शेंदुर्णी ता. जामनेर याने तीन हजार रूपयांची मागणी ११ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे…
“महामातांचा जागर ” ही ऐतिहासिक कामगिरी लक्ष्मणराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील भवरखेडे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या प्रबोधन जागराचा समारोप काल भवरखेडे येथे संपन्न झाला. राजमाता जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन, जिजाऊ जयंती, युवा दिनाचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले. लहान माळी वाडा धरणगाव, विवरे, पष्टाने, बांभोरी, गंगापुरी, गारखेडे, धानोरा, सोनवद आणि आज भवरखेडे येथे शेवटचे पुष्प आम्ही गुंफत आहोत, अशी माहिती हेमंत माळी यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रुपाली किरण पाटील…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. आजच्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. कोराना अहवालानुसार जळगाव शहरात-१११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७१, अमळनेर-६, चोपडा-३५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ लाख ४४ हजार ४२८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख…
जळगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज समोर आले आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन. अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हेसहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या नंतर राज्य मंत्रीमंडळातील सुमारे २० मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांना सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. आज शुक्रवारी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.ना. गुलाबराव यांनी…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असलम सायबु तडवी (वय-३० ) असे मयत तरूणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम तडवी हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता असलम तडवी यांचे कुटुंबिय थंडीचे दिवस असल्यामुळे घराबाहेर उन्हात बसले होते. त्यावेळी असलम तडवीने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. असलमचा सहा वर्षाचा मुलगा आशु तडवी हा…

