Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (वय-२२) रा. शिरसोली प्र.न. ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासह वास्तव्याला आहे. अजय बारी हा खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करत असून आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. विवाहितेच्या सोबत सासू, सासरे, जेठ व जेठाणी हे राहतात. प्राजक्ता या विवाहितेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले. आत्महत्या करण्याचे…

Read More

बोदवड प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागातील जागांसाठी आज मतमोजणी करण्यात आली. आतापर्यंत १२ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून या निकालात शिवसेनेने ७ जागांवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तर राष्ट्रवादीला ७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना त्यांच्याच होमग्राऊंडला जोरदार धक्का बसला आहे. तर भाजपला ईश्वरचिठ्ठीने एक जागा मिळविली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात आज निवडणूकीनंतर मतमोजणी करण्यात आली. बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीपासून राष्ट्रवादीने आघाडी ठेवली होती. भाजपाला केवळ एक जागेवर समाधान मानले असून मुक्‍ताईनगर मतदार संघ असलेल्‍या आमदार चंद्रकांत पाटील यांच्‍या उमेदवारांनी नंतरच्‍या फेरींमध्‍ये बाजी पलवली. बोदवड…

Read More

बोदवड प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या आज मातमोजणीत पहिल्या जागांचे निकाल जाहीर झाले असून यात शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँगेसला ५ आणि भाजपाला १ जागा मिळाल्या आहे. प्रभाग क्र. १ – विजयी उमेदवार रेखा सोनू गायकवाड (४६६) मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) , भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) मिळाली प्रभाग क्र. २- राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील (३३७) मते मिळवून विजयी, शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३), भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळून पराभूत झाले. प्रभाग क्र.३ – राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आसोदा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ४ मध्ये एका जागेसाठी तिरंगी लढत झाली. आज मंगळवारी १८ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले असून ७० टक्के मतदान झाले. सविस्तर माहिती अशी की, जानेवारी २०२१ मध्ये आसोदा ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूकी एक व्यक्ती दोन जागेवर निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा एका जागेसाठी मंगळवार १८ जानेवारी रोजी वार्ड क्रमांक ४ साठी सर्वसाधारण स्त्री राखीव या मतदारसंघातून सार्वजनिक विद्यालयात मतदान घेण्यात आले. यात १ हजार ५५० मतदारांपैकी १ हजार ८८ जणांनी मतदान केले आहे. त्याप्रमाणे एकुण मतदार ७० टक्के मतदान झाले आहे. एका जागेसाठी ४ जणांनी उमेदवार रिंगणात उभे होते.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील चिंचपुरा येथे भरधाव रूग्णवाहिकेच्या धडकेत म्हैस जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरीकांनी रास्ता रोको केल्यामुळे रस्त्यावरीन दोन्ही बाजूने वाहतूकीचा खोळंबा झाला होतो. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे भरधाव वेगाने जाणारी रूग्णवाहिकेने दोन म्हशींना जोरदार धडक दिली. या धडकेत एक म्हैस जागीच ठार झाली तर दुसरी जखमी झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको केलेा. त्यामुळे रस्त्यावरील दोन्ही  बाजूने वाहतूकीचा पुर्ण खोळंबा झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पथकातील  सपोनि श्री. अहिरे आणि पोहेका…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । तालुक्यातील पिंप्री खूर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात मंगळवारी धरणगाव तालुका आरोग्य विभागाच्यावतीने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे हे उपस्थित होते. त्यांनी कोरोना बाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातून आपोआपच इतरांचे आरोग्य जोपासले जाते असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मयूर हिवरकर, आरोग्य सेविका आशा लोखंडे, पुष्पा पढयार, कविता चौधरी, आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक नंदू चौधरी आदी सर्व उपस्थित होते . सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आजच्या अहवालात दिवसभरातून तब्बल ४०९ कोरोना बाधित रूग्ण संख्या आढळून आली आहे सोबतच १८० रूग्ण उपचार घेवून घरी गेले आहे. अशी माहितीसिव्हील सर्जन डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. आज जळगाव शहरात १५९, जळगाव ग्रामीण-१८, भुसावळ १०६, अमळनेर-५, चोपडा-४३, पाचोरा-९, भडगाव-१३, धरणगाव-६, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-४, पारोळा-९, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०आणि इतर जिल्ह्यातील २ याप्रमाणे एकुण ४०९ रूग्ण सापडले आहे. जळगाव जिल्ह्यात आजवर १ लाख ४५ हजार ७८५ रूग्ण आढळले त्यापैकी १ लाख ४० हजार ७२६ रूग्ण चांगले होवून घरी गेले. जिल्ह्यात सध्या २ हजार ४७८ कोरोना बाधित बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कंत्राटी कामाचे धनादेश काढण्यासाठी पाच टक्के कमिशन मागणाऱ्या रावेर येथील वन परिक्षेत्रीय अधिकारी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असून ते शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वनविभागकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवन अंतर्गत त्यांनी चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम ऑनलाईन ई-टेन्डरींगच्या पध्दतीने घेतले होते. यापैकी त्यांनी दोन काम पुर्ण केले होते. कामाचा त्यांना अद्याप धनादेश मिळालेला नव्हता. धनादेशाच्या मोबदल्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय-४५) रा. रावेर ता.जि.जळगाव यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे १ लाख ३० हजार…

Read More

पालकमंत्र्यांच्या घरासमोर विद्यापीठ सुधारणा कायद्याचा निषेध; भाजयुमोने काढली निषेधाची रांगोळी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक नुकतेच पारित करण्यात आले. या कायद्याला भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर सोमवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निषेधार्थ रांगोळी काढून निषेध व्यक्त करण्यात आला. विधी मंडळात महाविकास आघाडीच्या सरकारने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला राज्यात भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी १७ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या घरासमोर गनिमी कावा…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपुर्वी एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात गांजा वाहतूक प्रकरण चांगलेच गाजले होते. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला मध्यप्रदेशातील एनसीबीच्यापथकाने धरणगाव शहरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, जुलै २०२१ मध्ये मध्यप्रदेशातील इंदोर येथे गांजा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याचे या अधीच निष्पन्न झाले होते. याबाबत मध्यप्रदेशातील एनसीबी पथकाने चौकशीला सुरूवात केली होती. त्यानुसान मध्य प्रदेश एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी एरंडोल भागात येवून तस्करीवर नजर ठेवून होते. अशाच गांजा तस्करीचे कनेक्शन हे धरणगावतही आसल्याचे आढळून आल्याने एनसीबीच्यापथकाने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सापळा…

Read More