मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर वनक्षेत्र वडोदा वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात याबाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे असे मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. तर रहिम पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रहीम पवार हा डुकरांना मारण्याकरीता ठेवलेले गोळे घेऊन परत येत होता. यावेळी वनरक्षक ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे यांनी त्यास अडवले. तसेच वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे सांगत धुळगंडे यांनी आरोपीची समजूत काढली. मात्र रहीम पवार यास त्या गोष्टीचा राग आल्याने त्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून वनरक्षक ज्ञानोबा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका कंपनीत वेल्डींग करतांना झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा जागीच जळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. भुसावळ तालुक्यातील पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील ऑईल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट झाला. यात दुर्घटनेत काशिनाथ सुरवाडे रा. खेडी रोड जळगाव आणि खेमसिंग पटेल रा. बेमतेरा. छत्तीसगड या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. झालेल्या घटनेत स्फोटात मोठा आवाज झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली…
प्रतिनिधी प्रविण पाटील। तालुक्यातील विटनेर येथे गांधी रिसर्च फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोफत मोतीबिंदू शिबीराचे आयोजन शनिवारी २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विटनेर ग्रामपंचायत कार्यालयात मोफत मोतीबिंदू शिबिर ठेवण्यात आले आहे. विटनेर गावासह वसंतवाडी, जळके, सुभाषवाडी,वराड व परिसरातील वृद्ध व्यक्ती यांनी मोतीबिंदूचा तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन ठिबक सिंचनचे संचालक तसेच जळगाव तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष पी.के.पाटील व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मयुर गिरासे यांनी केले आहे.
रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील मस्कावद येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मस्कावद येथील १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलगी व तिचे कुटुंबिय हे मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवाशी आहे. कामाच्या निमित्ताने ते मस्कावद परिसारात राहतात. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता सर्वजण घरात झोपलेले असता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार ११ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात नातेवाईकांना धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात…
सरपंच राजेश वाडेकर यांनी स्वखर्चाने रूग्णवाहिका नागरीकांसाठी उपलब्ध प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील वाडदा येथे सरपंच राजेश वाडेकर यांच्या स्वखर्चाने माजी पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी सकाळी रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. वावडदा परिसरातील रुग्णासाठी वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर १० लाख रुपये खर्च करून माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवशी युवा नेते विशालदादा देवकर यांचा हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मजूर फेडरेशनचे चेअरमन लीलाधर तायडे, पुरुषोत्तम चधरी, अजय सोनावणे, निलेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, कानळदा येथील सरपंच पुडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण,…
धरणगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेश पाटील यांच्याबद्दल आमदार राजूमामा भोळे यांच्या घराबाहेर व संपर्क कार्यालयाबाहेर मध्यरात्री बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्यावतीने देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खा.उन्मेषदादा पाटील यांच्याविषयी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या घराबाहेर व संपर्क कार्यालयाबाहेर मध्यरात्री बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला. त्यावेळेस राजुमामा स्वतः घराबाहेर आले असता त्यांना (एमएच १९ ४१४१) या गाडीत ४-५ जण पळ काढतांना दिसले. सदर लिखाणातून खा. उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला. अश्या लोकांपासून दोन्ही नेत्यांच्या जीवितास धोका आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितावर…
धरणगाव तालुक्यात २० रुग्ण जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना रिपोर्टनुसार ४५१ कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. तर २८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज ४५१ रूग्ण आढळले आहे यात जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-५२, अमळनेर-१२, चोपडा-२१, पाचोरा-३, भडगाव-१२, धरणगाव-२०, यावल-१२, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-७, पारोळा-१८, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील ४ याचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हार ७०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३४ रूग्ण उपचार घेत…
रुग्णांची होणार मोठी आर्थिक बचत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने आता देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसापासून राबविल्या जाणाऱ्या या अभियानात सर्व शस्त्रक्रिया अगदी माफक दरात केल्या जात आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजना असल्या, तरी अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश नाही. परिणामी रुग्णांना अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागत आहे. यामुळे बरेच रुग्ण शस्त्रक्रिया न करता दुखणे अंगावर काढत आहेत. ही परिस्थिती पाहता मोतीबिंदूप्रमाणे अत्यंत कमी खर्चात विविध शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय देवकर रूग्णालय प्रशासनाने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी तिच्याच अज्ञात व्यक्तीने मित्रासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील एका तरूणीच्या मित्राने तिचे लग्न मोडावे व बदनामी होईल या उद्देशाने तिच्या पतीच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून तरूणीसोबत असलेल्या एका मित्राचे एकत्र असलेले फोटो पाठविले. हा प्रकार तरूणीच्या लक्षात आल्यानंतर बुधवारी तरूणीने सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार फोटो पाठविणा-या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून पासून २४ जानेवारी रोजी पासून कोरोना संसर्ग कमी असलेल्या भागातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, “सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या…

