जळगाव (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना शाळेतच मद्यपान अवस्थेत आढळल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने कठोर कारवाई केली आहे. ‘लाईव्ह महाराष्ट्र न्यूज’ने या गंभीर प्रकरणाची बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेऊन शिक्षकाला निलंबित केले आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांच्या निर्देशानुसार, पंचायत समिती धरणगावच्या गट विकास अधिकारी यांनी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. सीईओ करनवाल यांनी या प्राप्त तक्रारीची तत्काळ दखल घेऊन ही कारवाई केली आहे.नेमके काय घडले?दिनांक ६ ऑक्टोबर रोजी कवठळ येथील जिल्हा परिषद शाळा बंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संतप्त ग्रामस्थांनी याबाबतची माहिती…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव-प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदसर शिवारात एका दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मोठी खळबळ उडाली. गावठी हातभट्टीची दारू पिल्यानेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संतप्त नातेवाईकांनी दारू विक्रीच्या दुकानाची तोडफोड आणि जाळपोळ केली.हिरालाल अशोक सोनवणे (वय ३७, रा. चोरगाव, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हिरालाल यांचा मृतदेह चांदसर शिवारातील दारूच्या दुकानाजवळ आढळला. ही माहिती मिळताच मयताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ घटनास्थळी जमले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.त्यानंतर विषारी गावठी दारूमुळे हिरालालचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, संतप्त जमावाने दारू विक्री करणाऱ्या हॉटेल वर हल्ला चढवला. त्यांनी दगडफेक…
जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता रोहन घुगे हे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार.मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून आज (दि.०७) १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officer Transfer) केल्या आहेत. यामध्ये सध्या जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे पदभार घेणार आहे.
विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज : स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रंधुमाळी सुरू असताना आज दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव सह पाच तालुक्याचे नगराध्यक्ष पद महिला राखीव झाले असल्याचे समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव सह पाच तालुक्यातील नगराध्यक्ष पद महिलांसाठी खुले करण्यात आले आहे. अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे.या ठिकाणी महिला होणार नगराध्यक्ष धरणगाव, जामनेर, रावेर, यावल,पाचोरा, फैजपूर
मुंबई | प्रतिनिधी लाईव्ह महाराष्ट्र न्युज राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीसाठी बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक मुंबई मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात पार पडणार आहे.या बैठकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्यांना औपचारिक पत्र देण्यात आले आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी या संदर्भातील पत्रक सर्व पक्षांच्या अध्यक्षांना पाठवले आहे.राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदाच्या रेसमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी…
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात ऑनलाईन फसवणुकीसाठी बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. ममुराबाद रोडवरील एल के. फॉर्म येथे चालणाऱ्या या गोरखधंद्यावर धाड टाकून पोलिसांनी कॉल सेंटरच्या मालकासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या माजी महापौर ललीत कोल्हे यांचा समावेश आहे.अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी (२७ सप्टेंबर) या अवैध कॉल सेंटरबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची शहानिशा होताच त्यांनी कोणतीही वेळ न दवडता, रविवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एल के. फॉर्मवर छापा टाकला.३१ लॅपटॉपसह संपूर्ण सेटअप जप्तपोलिसांनी धाड टाकली असता, या…
मुंबई : वृत्तसंस्थाराज्यातील महायुती सरकारसाठी महत्वाची योजना म्हणून लाडकी बहिण योजनेकडे पाहिले जात आहे. या ‘लाडकी बहीण’ योजनेनुसार फक्त वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. विशेष म्हणजे, कार्यरत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी यांना या योजनेतून लाभ घेण्यास स्पष्ट मनाई आहे. तरीही काही महिलांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केली. महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अशा सर्व बोगस लाभार्थींची यादी तयार केली आहे. या यादीत जिल्हा परिषदेतील कर्मचारी, शिक्षक, विविध शासकीय विभागातील महिला कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचारी अशा 8 हजारांपेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’…
जळगाव : प्रतिनिधीतालुक्यातील दापोरा गावावर एक शोककळा पसरवणारी दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. स्वतःच्या घराचे स्वप्न उरात बाळगून काम करणाऱ्या ३० वर्षीय मयूर काळे या तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याने काळे कुटुंबासह संपूर्ण गाव हळहळून गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मयूर किशोर काळे (वय ३०) हा शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या परिवारात आई-वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगी आहे. आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने मयूर गुरुवारी (२५ सप्टेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास बांधकामस्थळी गेला होता. काम सुरू असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसून तो जमिनीवर कोसळला.शेजारील तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याला तत्काळ जळगाव येथील…
जळगाव : शहरातील नामांकित संशोधक, सायंटिफिक रायटिंग क्षेत्रातील मानद संचालक आणि प्राचार्य प्रा. डॉ. हर्षल लिलाधर तारे यांना नुकतीच दुसरी पीएच.डी. पदवी प्राप्त झाली असून, त्यामुळे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाने ‘इको फ्रेंडली मार्केटिंग : ग्राहकांवर होणारा परिणाम’ या विषयावर सादर केलेल्या संशोधनासाठी त्यांना व्यवस्थापन आणि वाणिज्य या शाखेत पीएच.डी. पदवी बहाल केली आहे.या संशोधनात त्यांना विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. आशिष गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात पीएच.डी. प्राप्त केली होती. त्यामुळे डॉ. तारे यांची डबल डॉक्टरेटधारक म्हणून नोंद झाली आहे.संशोधन कार्यकाळात त्यांनी…
धरणगाव : प्रतिनिधीधरणगाव – चोपडा मार्ग हा केवळ दोन तालुक्यांना जोडणारा नव्हे, तर महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही एक जीवनवाहिनी ठरते. मात्र या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात कामाच्या दर्जात अत्यंत हलगर्जीपणा दिसून येत आहे.कालपासून पिपळे फाटा – साळवा फाटा मार्गावरील रस्त्यावर अनेक गाड्या खोल चिखलात फसल्याची दृश्ये समोर आली असून, नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागले. हा प्रकार केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नसून, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांचे नियंत्रण सुटणे, रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होणे, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा…