Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षकांच्या मागण्या अजित पवारांपर्यंत पोहोचवणार
    जळगाव

    शिक्षकांच्या मागण्या अजित पवारांपर्यंत पोहोचवणार

    editor deskBy editor deskSeptember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या रास्त असून, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्यातर्फे राज्य शासनाकडे विधिमंडळात शिक्षकांची कैफियत मांडली जाईल, असे आश्वासन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शिक्षकांना दिले.

    आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. देवकर, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी व जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी भेट देऊन शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन श्री. देवकर यांच्याकडे सोपविले.

    निवेदनात शिक्षकांनी म्हटले आहे, की आम्हाला शैक्षणिक कामकाज करू द्या, शालेय उपक्रमांचा शिक्षकांवर होत असलेला भडीमार कमी करुन आम्हाला शिकवू द्या, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगाचा खंड दोन लागू करून सर्व तरतुदी लागू कराव्यात, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्यात यावी, शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्यात यावे, एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात यावी यासह विविध मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. या सर्व मागण्यांचा अजित पवार यांच्यामार्फत विधिमंडळात पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. देवकर यांनी शिक्षकांना यावेळी दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.