Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री मुलीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ अन् धमकी : दोघांना अटक!
    क्राईम

    मध्यरात्री मुलीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ अन् धमकी : दोघांना अटक!

    editor deskBy editor deskOctober 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    क्लासह कॉलेजला जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिच्या घरासमोर येवून मी तुझा नवरा आहे म्हणत आरडाओरड केल्याचा प्रकार दि. २१ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १७ वर्षीय मुलगी वास्तव्यास असून ती क्लास व कॉलेजला जात असतांना संशयित आरोपी तिचा नेहमी पाठलाग करीत होता. दि. २१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास  संशयित  मित्रासह  घराबाहेर गेले. त्यांनी तिच्या घरासमोर येवून मोठमोठ्याने मी तुझा नवरा आहे असे म्हणत त्यांच्या घराच्या गेटला लाथा मारीत शिवीगाळ करु लागले. तसेच तुमच्या मुलाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील त्यांनी दिली. वारंवार होणारा त्रास असह्य झाल्यामुळे पीडितेने दि. २३ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित  आरोपीविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा : फसवणुकीचे नवे धागेदोरे उघड!

    October 25, 2026

    खांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का : महावितरणच्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू!

    October 25, 2026

    पान-सिगारेट देण्यास नकार दिला अन् कोयता-तलवारीने हल्ला! जळगावात खळबळ; १२ तासांत तिघे अटकेत!

    October 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.