Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा : फसवणुकीचे नवे धागेदोरे उघड!
    क्राईम

    गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा : फसवणुकीचे नवे धागेदोरे उघड!

    editor deskBy editor deskOctober 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    हर्बल लाईफ कंपनीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून २ जणांची १ कोटी २३ लाख रुपयात फसवणुक करणाऱ्या दिपेश कमलेश रुपानी (रा. गणपती नगर, जळगाव) याला अटक केली आहे. चौकशीत त्याने जळगावातील इतर दोघांना १२ लाखात गंडविल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २६ ऑक्टोंबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

    हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे अमिष दाखवून २ जणांची १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी दीड वर्षांपासून पसार असलेल्या दिपेश रुपानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १९ ऑक्टोबर रोजी अटक केले होते. सुरुवातीला संशयिताला दि. २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीदरम्यान त्याच्या चौकशीतून अनेक मुद्दे समोर येत आहेत. नागरिकांना गुंतवणूक करण्याचे सांगत त्याने त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावरही रक्कम स्वीकारली. या बँक खात्यांचा पोलिस पथकाकडून तपास सुरू आहे. दिपेश याला अटक केल्यानंतर फसवणूक झालेले इतर जणही पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये जळगावातील दोन जणांनी आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन फसवणुकीची माहिती दिली. त्यानुसार या दोघांची प्रत्येकी ६ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. दिपेश रुपानी याच्या पोलिस कोठडीची मुदत २३ ऑक्टोबर रोजी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    या सोबतच मध्यप्रदेशातील बालाघाट येथीलही नागरिकांना दिपेश याने असाच गंडा घातला असून तेथील नागरिक जळगाव आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधत आहेत. तसेच अकोला व अमरावती येथीलही नागरिकांची फसवणूक झाली असून अमरावती पोलिस आयुक्त क्षेत्रातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिपेश रुपानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून तेथील पोलिसही २ वर्षांपासून त्याच्या मागावर आहेत. त्यामुळे अमरावती पोलिस न्यायालयाची परवानगी घेऊन दिपेशचा ताबा घेणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री मुलीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ अन् धमकी : दोघांना अटक!

    October 25, 2026

    खांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का : महावितरणच्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू!

    October 25, 2026

    पान-सिगारेट देण्यास नकार दिला अन् कोयता-तलवारीने हल्ला! जळगावात खळबळ; १२ तासांत तिघे अटकेत!

    October 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.