Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का : महावितरणच्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू!
    क्राईम

    खांबावर दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का : महावितरणच्या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू!

    editor deskBy editor deskOctober 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    खांबावर काम करताना विजेचा धक्का लागून किरण दत्तात्रय सपकाळे (वय ४२, रा. आशाबाबा नगर) या वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील आशाबाबा नगरात राहणारे किरण सपकाळे हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून कामाला होते. शनिवारी एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियम प्लांटपासून काही अंतरावर असलेल्या वीज खांबावर ते दुरुस्तीचे काम करत होते. त्या वेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का लागला व ते खांबावरुन थेट खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

    खांबावर काम करण्यासाठी वीजपुरवठा खंडीत करण्याचे परमिट घेतलेले होते तरी वीजपुरवठा सुरू झाला व ही घटना घडली अशी माहिती रुग्णालयात मयताच्या मित्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच कर्मचारी, मित्र परिवार यांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा : फसवणुकीचे नवे धागेदोरे उघड!

    October 25, 2026

    मध्यरात्री मुलीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ अन् धमकी : दोघांना अटक!

    October 25, 2026

    पान-सिगारेट देण्यास नकार दिला अन् कोयता-तलवारीने हल्ला! जळगावात खळबळ; १२ तासांत तिघे अटकेत!

    October 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.