Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट! गोंदे गावातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा मोठा प्रहार
    क्राईम

    १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट! गोंदे गावातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा मोठा प्रहार

    editor deskBy editor deskNovember 20, 2026Updated:November 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जामनेर तालुक्यातील गोंदे गावात अवैध गावठी दारू तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला आहे.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. फत्तेपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोंदे गावात छापेमारी केली.

    या कारवाईत सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले, तर ३० लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट व जप्त केला आहे.  या प्रकरणी जाबीर हसन तडवी (३८), फकीरा रमेश तडवी (३७), हजराबाई युनूस तडवी (३४) आणि रहमान कासम तडवी (७१) या चार जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

    November 20, 2026

    दुचाकी चोरांची टोळी जेरबंद : दोघांना अटक; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत !

    November 20, 2026

    लग्नसमारंभात वाद, पाठीत चॉपरचा वार अन् तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

    November 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.