Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गोलाणी मार्केट हादरले : चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात !
    क्राईम

    गोलाणी मार्केट हादरले : चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात !

    editor deskBy editor deskNovember 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवरुन उडी घेवून अनोळखी २५ ते ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मागील बाजूस घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजून गेली. तरुणाचा मृतदेह पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. गच्चीवर मयताची एक चप्पल आणि तेथेच नशेसाठीचा बाँड मिळून आल्यामुळे तरुणाने नशेतून हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. तरुणाने आत्महत्या केली की, त्याला कोणी ढकलून दिले या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मागील बाजूस बसलेल्या एक विंगमध्ये पहिल्या दोन मजल्यावर मोबाईलसह अन्य साहित्य विक्रेत्यांची दुकाने आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर रहिवाशांची घरे आहे. चौथ्या मजल्यावर जाण्याकरीता रहिवाशांनी चॅनल गेट बसविले असून त्याला कुलूप लावलेले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास २५ ते ३० वर्षीय इसम मार्केटमधील चौथ्या मजल्यावर गेला. याठिकाणाहून त्याने थेट खाली उडी मारीत आपली जीवनयात्रा संपविली. गोलाणी मार्केटमध्ये दिवसभर ग्राहकांची गर्दी असते, अचानक चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ माजून गेली होती. दरम्यान, उडी मारल्यामुळे तरुणाच्या डोक्याच्या आतील भाग बाहेर आला होता, तर तरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

    ही घटना मार्केटमधील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोहेकॉ नंदलाल पाटील, सतिष पाटील, विरेंद्र शिंदे, राहुल पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

    मयताची एक चप्पल त्याच्या मृतदेहाजवळ होती, तर दुसरी त्याने गच्चीवरुन उडी घेतली तेथे होती. पोलिसांनी ती चप्पल ताब्यात घेतली. तसेच तरुणाच्या खिशात काहीही मिळून न आल्याने पोलिसांकडून त्याची ओळख पटविली जात आहे. त्याचप्रमाणे गच्चीवर एक प्लास्टीकची पिशवी आणि रिकामा बाँड मिळून आल्यामुळे तरुणाने नशेतून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या तृतीय पंथी यांनी जिन्याला चॅनल गेट बसविले आहे. त्या गेटला कुलूप लावलेले असल्यामुळे तेथून गच्चीवर जाणे शक्य नाही. परंतू मयत तरुणाने त्या गेटचा काही भाग तोडून तो गच्चीवर गेला आणि तेथून त्याने खाली उडी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जन्मदाताच बनला मुलांचा वैरी : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

    November 18, 2026

    जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !

    November 18, 2026

    विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवघेणे : तरुण ४० टक्के भाजला

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.