Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !
    क्राईम

    जळगावात संतापजनक घटना : चुलत मामाचे बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक !

    editor deskBy editor deskNovember 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आजीकडे राहत असलेल्या ६ वर्षीय बालिकेवर तिच्या चुलत मामानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ५ वर्षानंतर उघडकीस आली आहे. हा प्रकार सन २०२१ ते २०२४ दरम्यान रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडला. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या चुलत मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे येथे खासगी नोकरीला असलेल्या एका महिलेची ६ वर्षीय मुलगी जळगावातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात राहणाऱ्या आजीकडे राहत होती. त्या बालिकेचा चुलत मामा याठिकाणी आजीकडे येत होता. जानेवारी २०२१ ते २०२४ या दरम्यान सदर बालिका घरी एकटीच असताना चुलत मामाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर ही बालिका पुणे येथे आईकडे गेली तेव्हा तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्या वेळी तिच्या आईने दि. १६ नोव्हेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पीडित मुलीच्या चुलत मामाविरुद्ध पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर केले असता दि. २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जन्मदाताच बनला मुलांचा वैरी : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

    November 18, 2026

    गोलाणी मार्केट हादरले : चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात !

    November 18, 2026

    विजेच्या खांबावर चढणे ठरले जीवघेणे : तरुण ४० टक्के भाजला

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.