

जळगाव : प्रतिनिधी
कामाच्या शोधात असताना विजेच्या खांबावर चढलेल्या भाईदास कर्तार राठोड (वय ३५, रा. धानवड तांडा, ता. जळगाव) यांना विजेचा धक्का लागून ते चाळीस टक्के गंभीररित्या भाजले गेले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मंगळवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी चिंचोली गावाजवळ घडली.
चिंचोली परिसरात कामानिमित्त मजुरी काम करणारे भाईदास राठोड हे गेलेले होते. मंगळवारी सकाळी ते एका वीज खांबावर चढले व त्यांनी वीज तारांना पकडले. त्यात त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व त्यांचा उजवा हात, छाती, पोट, पाठ पूर्णपणे भाजली गेली. तसेच काही वेळाने ते खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुण जखमी झाल्याने त्याचे फोटो काढून नागरिकांना सोशल मीडियावर पाठविले. त्या वेळी धानवड येथील रहिवाशांना हे फोटो दिसले आणि त्यांनी तरुणाची ओळख पटली.



