Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कर्की येथे जिल्हाधिकाऱ्यांची CSC केंद्राला भेट; पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या!
    मुक्ताईनगर

    कर्की येथे जिल्हाधिकाऱ्यांची CSC केंद्राला भेट; पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 30, 2026Updated:October 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कर्की, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी – मनोज पाटील) : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी पीक विमा प्रक्रियेची माहिती घेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

    या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी CSC केंद्रातील कामकाजाची पाहणी करून पीक विमा अर्ज प्रक्रिया, नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी आणि योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेतली.

    यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पीक विम्याशी संबंधित विविध समस्या आणि अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या माध्यमातून योग्य कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

    जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गावात येऊन CSC केंद्राची पाहणी केल्याने आणि शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता पीक विम्याशी संबंधित समस्यांवर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मुक्ताईनगर-नायगाव फाट्यावर मृत्यूचा थरार! भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच अंत

    September 14, 2026

    मुक्ताईनगरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; तहसीलदारांना निवेदन

    September 4, 2026

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.