

कर्की, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी – मनोज पाटील) : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी पीक विमा प्रक्रियेची माहिती घेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी CSC केंद्रातील कामकाजाची पाहणी करून पीक विमा अर्ज प्रक्रिया, नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी आणि योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पीक विम्याशी संबंधित विविध समस्या आणि अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाच्या माध्यमातून योग्य कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी थेट गावात येऊन CSC केंद्राची पाहणी केल्याने आणि शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आता पीक विम्याशी संबंधित समस्यांवर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



