Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुक्ताईनगरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; तहसीलदारांना निवेदन
    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; तहसीलदारांना निवेदन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 4, 2026Updated:September 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड चौक ते परिवर्तन चौकापर्यंत धडक; संविधान बचावाच्या घोषणांनी परिसर दणाणला

    मुक्ताईनगर (प्रतिनिधी मनोज पाटील) : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध तसेच संविधान बचाव आणि देश बचावाच्या भूमिकेतून मुक्ताईनगर येथे भव्य महामोर्चा काढण्यात आला. बोदवड चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा परिवर्तन चौकापर्यंत काढण्यात आला. यावेळी नागरिक, महिला, आंबेडकरी अनुयायी तसेच बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

    मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांनी निळे झेंडे, भारतीय राष्ट्रध्वज आणि विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. ‘आरक्षण बचाव, देश बचाव’ आणि ‘संविधान बचाव, देश बचाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

    मोर्चाच्या अग्रभागी ‘अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा’ असा मजकूर असलेला मोठा फलक झळकत होता. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन आंदोलकांनी आपली भूमिका मांडली.

    बोदवड चौकातून सुरू झालेला मोर्चा परिवर्तन चौकात पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करत शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

    या महामोर्चामुळे मुक्ताईनगर शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागामुळे मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    August 16, 2026

    भरधाव अर्टिगा कारने नागरिकांना उडवले; पाच जखमी, दोन नंबर प्लेटमुळे संशय वाढला

    March 12, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.