Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी
    जळगाव

    रावेर लोकसभेत राष्ट्रवादीची नवी टीम; हाजी अनवर खाटीक यांच्यावर मोठी जबाबदारी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 16, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : फैजपूर शहरातील नगरसेवक हाजी अनवर खाटीक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली असून, मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाने तसेच आमदार एकनाथराव खडसे, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा नेते रवींद्र पाटील, श्रीराम पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार्याने ही नियुक्ती झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

    नियुक्तीपत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय-धोरणे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

    यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहर प्रदेशाध्यक्ष विशाल वाकोडकर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अफजल फारुकी, अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वारिस खान, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, हाजी याहया सैय्यद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    हाजी अनवर खाटीक यांच्या निवडीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मोठी बातमी : वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा: दोन महिला व एक पुरुष ताब्यात

    August 13, 2026

    मेहरूण तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडवर; १६ ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढणार

    August 12, 2026

    जळगाव जिल्ह्यात ‘तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.