Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाशिक कारागृहातून १० संशयितांना ‘रिमांड’वर आणले! यावलमध्ये दोन चोरीच्या गुन्ह्यांत कारवाई
    क्राईम

    नाशिक कारागृहातून १० संशयितांना ‘रिमांड’वर आणले! यावलमध्ये दोन चोरीच्या गुन्ह्यांत कारवाई

    editor deskBy editor deskOctober 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    किनगाव शिवारात विद्युत तार व केबल वायर चोरीप्रकरणी नाशिक कारागृहातील १० सशंवीतांना यावल पोलिसांनी पुन्हा दोन गुन्ह्यात अटक केली आहे. यासशयितांपैकी यावल न्यायालयात ६ तर भुसावळ न्यायालयात ४ जणांना हजर केले. दोन्ही न्यायालयांनी या सर्व १० जणांना दि. ३ ऑक्टोंबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली.

    मिळालेल्या माहितीनुसार, किनगावपासून मालोद जाणारा रस्त्यावर शेत शिवारात विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी प्रकरणात १० जणांना अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते. दरम्यान बुधवारी रात्री यावल शेत शिवारातुन विद्युत तार चोरी प्रकरणी अनिल शिंदे यांनी यावल पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात नाशिक कारागृहातुन सुपडू हमजान तडवी, करीम नशीर तडवी, अलाउद्दीन मजीद तडवी, आरिफ युसुफ मन्यार या चौघांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित तडवी, सुनिल पाटील करीत आहे.

    किनगाव प्रकरणात अटक केलेल्या आसिफ जुम्मा तडवी, अफसर अपकबर तडवी, खुदाबक्ष रशीद तडवी, विनोद मेहरबान तडवी, हैदर बशारत बडवी, सलीम भिका तडवी (सर्व रा. मालोद ता. यावल) यांना शिरसाड शिवारात केबल वायर चोरी प्रकरणी नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात यावल पोलिसांनी कारागृहातून ताब्यात घेतले. तपास यावल पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, हवालदार रोहिल गणेश करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पाच जण जेरबंद; ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

    October 2, 2026

    जळगावात एमडी ड्रग्जवर पोलिसांचा घणाघात : ३५ गुन्हे दाखल असलेला सराईत जेरबंद !

    October 2, 2026

    क्षणात चैन हिसकावली, चोरटे पसार! गणपतीनगरात ७२ वर्षीय महिलेची फसवणूक

    October 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.