Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पाच जण जेरबंद; ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
    क्राईम

    महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पाच जण जेरबंद; ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

    editor deskBy editor deskOctober 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील  कासोदा येथील पाच तरुणांकडून नेहमी होणाऱ्या छेडखानीला कंटाळून आडगाव येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली होती. या संदर्भात कासोदा येथील ५ तरुणांना अटक करून जळगाव येथील विशेष कोर्टात हजर केले असता त्यांना पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील तरुणीने आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबरला घडली होती. याबाबत संशयित आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महेश विठ्ठल मराठे (वय २१), अभिषेक सुनील उशिरे (वय २३), रोहित महेंद्र मोरे (वय २१), मनोज रामभाऊ गढरी (वय २१) आणि रुपेश आनंदा वारे (वय २१) यांच्यावर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ही तरुणी एरंडोल येथील महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर, २६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या तरुणीचे आई-वडील शेतातून घरी परत आल्यावर हा प्रकार लक्षात आला.

    दरम्यान, गेल्या काही दिवसापासून पीडित तरुणीला हे संशयित त्रास देत होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. श्रीकांत पाटील व पोलीस कर्मचारी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात एमडी ड्रग्जवर पोलिसांचा घणाघात : ३५ गुन्हे दाखल असलेला सराईत जेरबंद !

    October 2, 2026

    नाशिक कारागृहातून १० संशयितांना ‘रिमांड’वर आणले! यावलमध्ये दोन चोरीच्या गुन्ह्यांत कारवाई

    October 2, 2026

    क्षणात चैन हिसकावली, चोरटे पसार! गणपतीनगरात ७२ वर्षीय महिलेची फसवणूक

    October 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.