Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा !
    जळगाव

    प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा !

    editor deskBy editor deskSeptember 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमदार राजूमामा भोळे यांचे विशेष सहकार्य; पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कौतुकास्पद उपक्रम

    जळगाव : प्रतिनिधी

    बातमीच्या शोधात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिवसभर दुचाकीवरून धावपळ करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील सदस्य, वृत्तपत्रांचे छायाचित्रकार तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत अपघाती विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    या उपक्रमांतर्गत सुमारे १०० पत्रकार व मीडिया प्रतिनिधींचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित पत्रकाराचा अपघाती मृत्यू किंवा विमा योजनेतील नियमानुसार अपघाती दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.

    पत्रकारांचे काम हे केवळ कार्यालयापुरते मर्यादित नसते. अपघात, गुन्हे, नैसर्गिक आपत्ती, राजकीय कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच विविध घटनांचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकारांना दिवस-रात्र शहरासह ग्रामीण भागात प्रवास करावा लागतो. अनेकदा तातडीच्या बातमीसाठी धावताना त्यांना वाहतुकीच्या धोक्यांनाही सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळावी आणि पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जावा, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.

    या सामाजिक उपक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले. पत्रकारांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी सहकार्य केल्याबद्दल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार भोळे यांचे आभार व्यक्त केले.

    हे विमा शिबिर प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख, प्रभारी अध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजीत पाटील आणि सहसचिव हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडले.

    शिबिराच्या आयोजनासाठी प्रकाश कलगायित, जुगल पाटील, भूषण पाटील, अरुण इंगळे, संधीपाल वानखेडे आणि पांडुरंग महाले यांनी विशेष परिश्रम घेतले. विमा शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांच्या आरोग्य व आर्थिक सुरक्षेच्या प्रश्नाकडे सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याने पत्रकार वर्गातून या उपक्रमाचे स्वागत व कौतुक होत आहे.

    पत्रकारांच्या व्यावसायिक कामासोबतच त्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी घेणे हीदेखील सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतून भविष्यातही पत्रकारांच्या हितासाठी विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सुरक्षा उपक्रम राबविण्याचा मानस प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमी युगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या टवाळखोरांवर पोलिसांचा दणका; टेकडीवर दामिनीची नजर

    September 4, 2026

    जळगावचे नवे प्रांताधिकारी योगेशकुमार मीना; विनय गोसावी यांची बदली

    September 4, 2026

    आनंदाची बातमी : ‘या’ एक्सप्रेसला मिळाला धरणगाव येथे थांबा !

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.