Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !
    क्राईम

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskAugust 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील किनगाव या गावात हॉटेल जत्राच्या मागे असलेल्या एका गुरांच्या गोठयात २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली असून, त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुण हा आडगाव (ता. यावल) येथील रहिवाशी होता.

    मिळालेल्या माहितीनुसार,  किनगाव ता. यावल या गावात हॉटेल जत्रा आहे. या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या गुरांच्या गोठयात गणेश हाजी बारेला (वय २३ रा. आडगाव ता. यावल) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले होते. हा तरुण बेशुद्ध अवस्थेत तेथे आढळला त्याच्या तोंडातून फेस येत होता. तेव्हा तातडीने त्याला तेथून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आले. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हाजी नानसिंग बारेला यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026

    जळगावात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक : एक पोलिसांच्या ताब्यात !

    August 23, 2026

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.