
विजय पाटील :लाईव्ह महाराष्ट्र न्युज : वयाच्या अल्पावधीत शैक्षणिक संस्थांचे जाळे गावागावात विखरणारे शिक्षण क्षेत्रातील डॉन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना खिशात घेऊन काम करणारा जळगाव ग्रामीणचा रहिवासी डॉन मनोज यांच्यावर कुठल्याही क्षणी नाशिकच्या पथकाकडून कारवाई होण्याची संकेत व्यक्त होत आहे दरम्यान मोबाईल स्विचऑफ असून फरार म्हणजेच अज्ञात ठिकाणी डॉन मनोज लपून बसला असल्याचे समजते.
शालार्थ आयडी प्रकरणाचे जाळे हळूहळू जळगाव जिल्ह्यात पोहोचले असले तरी जळगाव ग्रामीणचा मनोज नावाचा मोठा डॉन लवकरच रडारवर असून काही प्रमाणात दोन महिन्यापासून राजकीय नेत्याच्या पीए कडून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु त्या पीएची सुपारी आता फेल जाणार असून अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे गरुड यांना अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाचा मास्टर माईंड मनोज याला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत जळगाव ग्रामीणमध्ये चर्चेला उधाण आले असून कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी या प्रकरणासंदर्भातील सविस्तर आणि अधिकृत अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र न्यूजला फॉलो करा. आणि सर्वात वेगवान अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा!



