Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आश्वासन; भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप
    क्राईम

    प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आश्वासन; भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप

    editor deskBy editor deskSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा आरोप अमरावती जिल्ह्यातील २० वर्षीय तरुणीने केला आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून जालना जिल्ह्यातील २४ वर्षीय ऋषिकेश लक्ष्मणराव वाघ (रा. धोंडखेडा, ता. भोकरदन, जि. जालना) याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची संशयित ऋषिकेश वाघ याच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवरून नियमित बोलणे सुरू झाले आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. २६ ऑगस्ट २०२५ रोजी तरुणाने तरुणीला भुसावळात बोलावले. त्यानुसार ती अमरावती येथून रेल्वेने भुसावळात आली. दुपारी सुमारे ३ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर संशयिताने तिला एका लॉजमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने फिर्यादीत केला आहे. यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने १० जानेवारीनंतर त्यांचे बोलणे बंद झाले. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संशयिताने फोन करून लग्न करता येणार नसल्याचे सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. मार्च २०२६ मध्ये तरुणीने संशयित तसेच त्याच्या आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने ती आसेगाव-पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी ऋषिकेशचे वडील लक्ष्मणराव वाघ व त्याच्या आईने समजूत घालत समझोता केला. ऋषिकेश घरी आल्यानंतर त्याच्या लग्नाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आल्याने तरुणीने त्यावेळी तक्रार दाखल केली नाही.

    मात्र त्यानंतरही लग्नाचे आश्वासन पूर्ण न झाल्याने अखेर तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून संशयित ऋषिकेश लक्ष्मणराव वाघ याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहम्मद सव्यदकरीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वृद्धाश्रमातून बेपत्ता; सहा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला एकाचा मृतदेह!

    September 21, 2026

    धार्मिक कार्यक्रमासाठी गावी गेले, इकडे घरात चोरी; ५९ हजारांचा ऐवज गायब!

    September 21, 2026

    जळगाव बसस्थानकात भामट्याचा डाव; वृद्धाच्या खिशातून २१ हजारांवर डल्ला

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.