Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वृद्धाश्रमातून बेपत्ता; सहा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला एकाचा मृतदेह!
    क्राईम

    वृद्धाश्रमातून बेपत्ता; सहा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला एकाचा मृतदेह!

    editor deskBy editor deskSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या निर्मल लालचंद मोनानी (वय ५७, रा. सिंधी कॉलनी) यांचा मृतदेह आवार शिवारात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. ही घटना रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट वृद्धाश्रमात निर्मल मोमानी हे राहत होते. ते प्रज्ञाचक्षू असल्यामुळे त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. दि. १४ सप्टेंबर रोजी ते कोणालाही काहीही न सांगता वृद्धाश्रमातून निघून गेले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मा९ तरी देखील ते मिळून न आल्याने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.बेपत्ता झालेले निर्मल मोमानी हे दोन ते तीन दिवसांपासून आवारात ते विदगाव गावादरम्यान रस्त्यावर फिरत होते. दरम्यान आवार शिवारातील रस्त्यालगत असलेल्या एका शेतात त्यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह रविवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्याला दिसून आला.

    घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मृतदेहाच्या पायाचा भागाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. तर उर्वरीत संपुर्ण मृतदेह कुजलेला होता. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता असलेलया प्रौढाचा मृतदेह पुर्णपणे कुजलेला होता. तो मृतदेह उचलत असतांना त्याचे अवयव थेट हातात येत होते. दरम्यान, पोलिसांनी या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्याची विनंती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना केली. मात्र त्यांनी डॉक्टरांकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नव्हता. डॉक्टरांच्या अशा बेजबाबदार पणाचा पोलीसांना नाहक त्रास सहन करावा लागला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आश्वासन; भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप

    September 21, 2026

    धार्मिक कार्यक्रमासाठी गावी गेले, इकडे घरात चोरी; ५९ हजारांचा ऐवज गायब!

    September 21, 2026

    जळगाव बसस्थानकात भामट्याचा डाव; वृद्धाच्या खिशातून २१ हजारांवर डल्ला

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.