Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धार्मिक कार्यक्रमासाठी गावी गेले, इकडे घरात चोरी; ५९ हजारांचा ऐवज गायब!
    क्राईम

    धार्मिक कार्यक्रमासाठी गावी गेले, इकडे घरात चोरी; ५९ हजारांचा ऐवज गायब!

    editor deskBy editor deskSeptember 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कुटुंबीय जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे मूळ गावी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची मूर्ती चोरून नेली. ही घटना दि. १५ ते दि. १७ ऑगस्ट दरम्यान आयोध्यानगर परिसरातील लक्ष्मीनगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील अयोध्या नगरातील लक्ष्मी नगरात दीपक शंकर वराडे (वय ३७) हे वास्तव्यास असून ते शासकीय नोकरदार आहे. दि १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी गाडेगाव या मूळगावी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच कपाटातील ५० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, ३ हजार रुपये किमतीचा अर्धा ग्रॅम सोन्याचा ओम पत्ता, ५ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १ हजार ५०० रुपये किमतीची चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकूण ५९ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दीपक वराडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आश्वासन; भुसावळातील लॉजवर अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप

    September 21, 2026

    वृद्धाश्रमातून बेपत्ता; सहा दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला एकाचा मृतदेह!

    September 21, 2026

    जळगाव बसस्थानकात भामट्याचा डाव; वृद्धाच्या खिशातून २१ हजारांवर डल्ला

    September 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.