Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत
    क्राईम

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील : भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले.

    मृत महिलेचे नाव ललिता आत्माराम राठोड (वय ३६) असून, आरोपीचे नाव आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०, रा. वसंतवाडी तांडा) असे आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, आत्माराम राठोड याने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, ललिता यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने घरातील धारदार चाकूने त्यांच्या पोटावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या ललिता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. मृतदेह पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला.

    या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्माराम राठोड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार पुढील तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.