Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
    क्राईम

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी:  शहरातील आर.एल. चौफुली परिसरात रविवारी दुपारी अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या घरी परतत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

    घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह फरार झाला असून, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    संदीप अलकरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अचानक झालेल्या या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व परिचितांनी मोठी गर्दी केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

    July 26, 2026

    विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

    July 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.