धरणगाव : प्रतिनिधी
येथील धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या नावाने म. धर्मादाय उपायुक्त जळगाव येथे मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी हा संस्थेचा सर्वसाधारण सभासद देखील नसताना त्याने संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करून बनावट व खोटे फेरफार अर्ज क्र. 102/2015 दाखल केले होते. म. धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी दि. 08/04/2026 रोजी सदर बनावट व खोटे फेरफार अर्ज नामंजूर केले आहे. धरणगाव उर्दू एज्युकेशन सोसायटी तर्फे तत्कालीन उपाध्यक्ष श्री. शफी अहमद भाईमिया काजी यांनी हरकत घेतली होती. यांच्या तर्फे ॲड. डी. ओ.पाटील यांनी बाजू मांडली.
खोटे शिक्के बनवल्या प्रकरणी मोहम्मद नईम अख्तर अब्दुल हमीद काजी व ईतर 5 जणांविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. च्या 353, 143, 147, 149, 352, 448, 417, 465, 468, 471, 186, 323, 504 व 506 कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.



