Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘आमदार रोहित पवार म्हणजे बँडवाले’: राम शिंदेंची जोरदार टीका !
    क्राईम

    ‘आमदार रोहित पवार म्हणजे बँडवाले’: राम शिंदेंची जोरदार टीका !

    editor deskBy editor deskNovember 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राज्यभर राजकीय दौरे आणि आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला. ‘आमदार रोहित पवार म्हणजे बँडवाले आहेत. कुठेही आंदोलन असले की, मी वाजवायला येऊ का, असे ते विचारतात,’ अशा बोचऱ्या शब्दांत शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

    नगराध्यक्ष छाया सुनील शेलार यांच्या पुढाकारातून दीपावलीनिमित्त आयोजित सन्मान सोहळा आणि फराळ कार्यक्रमात राम शिंदे बोलत होते. या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक, जामखेड नगर परिषदेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदे यांनी राजकीय घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली.

    रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना राम शिंदे यांनी त्यांच्या राज्यभरातील आंदोलनांमधील सहभागाचा समाचार घेतला. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या विषयात रोहित पवार यांचा काय संबंध, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक ठिकाणच्या राजकीय विषयात हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यायला हवे, असेही त्यांनी सूचित केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत शिंदे म्हणाले की, २०१९ पासून काही काळ मतदारसंघात पाण्याचे टँकर सुरू होते. मात्र, आता दुष्काळी परिस्थितीत हे टँकर कुठे गायब झाले आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसेच पूर्वी आयोजित होणारा दहीहंडीचा कार्यक्रम आता का बंद झाला, नागरिकांना चष्मे वाटप करण्याचा उपक्रम कुठे गेला, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. चष्मे वाटपाचा उपक्रम बंद झाला असेल तर नागरिकांची दृष्टी आता पूर्णपणे चांगली झाली आहे का, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा संदर्भ देत राम शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार नसतानाही एका नेत्याने विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला जात होता, त्यालाच हा पाठिंबा नको असल्याचे चित्र होते, असा दावा त्यांनी केला. रोहित पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरूनही त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छठ पूजेच्या आडून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा डाव : राज ठाकरेंचा गंभीर आरोप!

    November 13, 2026

    जिल्हा बँकेसाठी महायुतीचे २१ उमेदवार निश्चित; उमेदवारांची यादी लाईव्ह महाराष्ट्राच्या हाती!

    November 13, 2026

    सुमित पाटलांची बाजी पलटली! विभागीय सहनिबंधकांचा अर्ज वैधतेचा निर्णय

    November 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.