Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
    क्राईम

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    editor deskBy editor deskApril 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील जवाहर हौसिंग सोसायटीमधील आनंद नथ्थू भोई (वय ३४) या तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. शहरात यंदा उन्हाळ्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  आनंद नथ्थू भोई हे दररोज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी भाजी विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे आजही ते आपल्या दुकानावर भाजी विक्रीसाठी आले होते. मात्र, सकाळी १० वाजेनंतर अचानक त्यांना चक्कर आली अन् ते दुकानावर असतानाच कोसळले. ही बाब परिसरातील दुकानदारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत आनंद भोई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026

    जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडून रोकड लांबविली !

    April 30, 2026

    सोशल मीडियावर पिस्तूल दाखवत दहशत; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या!

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.