Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
    क्राईम

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    editor deskBy editor deskApril 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    रस्त्याने पायी जाणाऱ्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात मुरलीधर कृष्णा माळी (वय ४९, रा. दत्त मंदिराजवळ नशिराबाद, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास सॉ मीलजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद यकेथील दत्त मंदिराजवळ मुरलीधर माळी हे वास्तव्यास आहे. दि. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातील दत्त मंदिर सॉ मीलजवळून पायी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात माळी हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना काही वेळातच मुरलीधर माळी यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.