यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील आडगाव या गावातील एका तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी गावात जावून पडताळणी केली असता तरूणाकडे चोरीच्या दोन दुचाकी आढळून आल्या. तेव्हा दोघं दुचाकी जप्त करीत तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याने धरणगाव येथुन दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आल्याने त्यास धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव ता. यावल येथील रहिवासी रुपेश अशोक मराठे (वय २८) या तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. तेव्हा या माहितीची पडताळणी करण्याच्या करीता त्यांनी सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार संदिप सुर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकास गावात पाठवले तेव्हा सदर तरूणाकडे चोरीच्या दोन मोटरसायकल मिळून आल्या. यातील एक मोटरसायकलचा तपास घेतला असता ती धरणगाव येथुन चोरीस गेल्याचे उघडकीय आले तर दुसरी मोटारसायकल भडगाव येथुन चोरीस गेली होती



