Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावासह भडगावतून चोरी गेलेली दुचाकीसह चोरटा ताब्यात !
    क्राईम

    धरणगावासह भडगावतून चोरी गेलेली दुचाकीसह चोरटा ताब्यात !

    editor deskBy editor deskApril 11, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील आडगाव या गावातील एका तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती यावल पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी गावात जावून पडताळणी केली असता तरूणाकडे चोरीच्या दोन दुचाकी आढळून आल्या. तेव्हा दोघं दुचाकी जप्त करीत तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याने धरणगाव येथुन दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आल्याने त्यास धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  आडगाव ता. यावल येथील रहिवासी रुपेश अशोक मराठे (वय २८) या तरूणाकडे चोरीच्या दुचाकी असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. तेव्हा या माहितीची पडताळणी करण्याच्या करीता त्यांनी सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार संदिप सुर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील या पथकास गावात पाठवले तेव्हा सदर तरूणाकडे चोरीच्या दोन मोटरसायकल मिळून आल्या. यातील एक मोटरसायकलचा तपास घेतला असता ती धरणगाव येथुन चोरीस गेल्याचे उघडकीय आले तर दुसरी मोटारसायकल भडगाव येथुन चोरीस गेली होती

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    August 23, 2026

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026

    जळगावात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक : एक पोलिसांच्या ताब्यात !

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.