Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » इच्छादेवी परिसरात आगीचा कहर; क्षणात तीन घरांचे संसार राख
    क्राईम

    इच्छादेवी परिसरात आगीचा कहर; क्षणात तीन घरांचे संसार राख

    editor deskBy editor deskApril 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील ईच्छादेवी मंदिराशेजारी फुकटपुरा भागातील पार्टीशनच्या घरांना आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करीत आजूबाजूची तीन घरे आपल्या विळख्यात घेतली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, मनपाच्या अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील ईच्छादेवी मंदिराशेजारी असलेल्या झोपपट्टी परिसरात भंगार व्यावसायीक आरिफ शेख हे घरात झोपलेले असतांना अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यांना आग लागल्याचे समजताच त्यांनी घराबाहेर पडले. दरम्यान, काही वेळातच आगीने त्यांच्या शेजारी राहणारे रफिक शेख व गंगाबाई मरसाळे यांची पार्टीशनची घरे आगीच्या विळख्यात घेतली. या आगीमध्ये तिघ घरांमधी संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून तिघ कुटुंबियांन अश्रू अनावर झाले होते.

    शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत तीन कुटुंबियांचे संसार डोळ्यासमोर जळून खाक झाल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी परिसरातीला नागकिरांनी त्या कुटुंबियांना धीर दिला. आग लागल्याचे कळताच या परिसरात राहणारे अकील पेंटर, आसिफ बापू, ईस्माईल खान, इसाक शहा, मिलींद सोनवणे, रियान खान यांच्यासह परिसरातील तरुणांनी तात्काळ मदतकार्य करीत आग विझविण्यास मदत केली. या तरुणांनी आग लागलेल्या परिसरातील नागरिकांच्या घरातील सिलींडर बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

    आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रशांत नाईक हे घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनेची माहिती मनपाच्या अग्शिमन विभागाला ‘दिल्यानंतर तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या बंबांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाळू डंपरचा मृत्यूचा वेग ; १९ वर्षीय विद्यार्थीनी ठार, मैत्रीण गंभीर !

    April 3, 2026

    विश्वासाचा गैरफायदा : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीरावर फसवणुकीचा गुन्हा

    April 3, 2026

    रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.