Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक
    क्राईम

    ‘गोल्ड लोन’च्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक

    editor deskBy editor deskJune 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ‘गोल्ड लोन’साठी तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडून घेता येईल, असे आमिष दाखवून एका सुवर्ण व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा भगवान शिंदे (वय ४४, रा. अयोध्यानगर, जळगाव) हे सुवर्ण व्यवसाय करतात. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांची ओम संजय महाजन (रा. गायत्री नगर, मेहरुण तलाव परिसर, जळगाव) याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत महाजन याने शिंदे यांना एका व्यक्तीचे १९८ ग्रॅम सोने ‘गोल्ड लोन’साठी तारण ठेवले असल्याचे सांगितले.

    या सोन्यावर सुमारे १९ लाख रुपये कर्ज असल्याने ती रक्कम भरून सोने सोडवून घेता येईल आणि नंतर ते मोडून नफा मिळवता येईल, असे आमिष महाजन याने शिंदे यांना दाखविले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिंदे यांनी महाजन याच्या बँक खात्यात १९ लाख रुपये जमा केले.

    मात्र, पैसे मिळाल्यानंतरही महाजन याने संबंधित सोने शिंदे यांच्या ताब्यात दिले नाही. त्यानंतर शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा करून पैशांची मागणी केली. यावेळी महाजन याने केवळ ९९ हजार रुपये परत केले. उर्वरित १८ लाख १ हजार रुपये तसेच सोनेही न देता टाळाटाळ सुरू केली.

    फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ओम संजय महाजन याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयित महाजन हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलिस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.