Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरकामाच्या बहाण्याने डल्ला; मोलकरणीच्या चोरीने लेक साईट रेसिडेन्सी हादरली
    क्राईम

    घरकामाच्या बहाण्याने डल्ला; मोलकरणीच्या चोरीने लेक साईट रेसिडेन्सी हादरली

    editor deskBy editor deskJune 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    घरकामास असलेल्या मोलकरणीने सुधा पुरुषोत्तम काबरा (वय ५९) व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पियूष दीपक संघवी (दोघ रा. लेकसाईट रेसिडेन्सी गणेश घाट) यांच्या घरातून ३ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. ९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोलकरीण समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९, मूळ रा. धारणी, ता. अमरोद, जि. अमरावती, ह.मु. रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या लेक साईट रेसिडेन्सी येथे सुधा काबरा या वास्तव्यास आहे. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरीता समोतीबाई धांडेकर या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होत्या. तर त्यांच्या घरासमोरील बंगल्यात राहणाऱ्या पियुष संघवी यांच्याकडे समोतीबाई या ८ ते ९ महिन्यांपासून कामाला आहे. दि. २५ मे रोजी सुधा काबरा यांना जालना येथे त्यांच्या आईकडे जायचे असल्याने त्यांनी बेडरुममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि मंगलपोत घालण्यासाठी गेल्या. परंतू त्यांना ड्रॉवरमध्ये दागिने दिसून न आल्याने त्यांनी पती आणि काम करणाऱ्या मोलकरणीला फोन करुन दागिन्यांबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी आपल्याला दागिने त्यांनी घेतले नसल्याचे सांगितले.

    सुधा काबरा यांना जालना येथे जाणे गरजेचे असल्याने त्या निघून गेल्या. त्यानंतर दि. २७ मे रोजी त्या घरी परतल्यानंतर त्यांना मोलकरीण समोतीबाई धांडेकर ही दि. २६ मे रोजी तिच्या मूळ गावी गेल्याचे समजले. त्यांनतर काबरा यांच्या घरासमोर राहणाऱ्या दीपक संघवी यांनी घरातील दागिने तपासले असता, त्यांना त्यांच्या पत्नीचे कानातले, शॉर्ट पोत मिळून आली नाही.

    दोन तीन दिवसानंतर काबरा यांनी मोलकरीण समोतीबाई हीला फोन करुन दागिन्यांबाबत विचारले असता, तीने दि. १० रोजी ती जळगावाला येणार असल्याने सांगितले. त्यानंतर सुधा काबरा या पियुष संघवी यांच्यासोबत ती राहत असलेल्या ठिकाणी गेल्या. परंतू समोतीबाई ही घरी मिळून न आल्याने दोघांनी तात्काळ एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मोलकरीण समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९, मूळ रा. धारणी, ता. अमरोद, जि. अमरावती, ह.मु. रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक करण्यात आली आहे.

    मोलकरणीने सुधा काबरा यांच्या घरातून १ लाख रुपयांची २ तोळे सोन्याचे मंगळसूत्र, दीड लाख रुपये किंमतीचे तीन तोळे सोन्याचे मंगलपोत तर दीपक संघवी यांची पत्नी तेजल संघवी यांची ७५ हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅमचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस, ४० हजा रुपयांचे ८ ग्रॅमचे कानातले टॉप्स असा एकूण ३ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जळगावात आयोजन; राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती !

    June 13, 2026

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    June 13, 2026

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.