Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !
    क्राईम

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    editor deskBy editor deskFebruary 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील जारगाव चौफुली परिसरात एका तरुणाने लोखंडी तलवार हातात घेऊन दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पाचोरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणास अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना एक तरुण तलवार घेऊन जारगाव चौफुली परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत पो.नि. पवार यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच संशयित सोमनाथ वना पाटील (वय १९, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. परिसरात अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

    या घटनेप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात आठवड्यातील ही सलग दुसरी कारवाई असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा अंकुश दिसून येत आहे.

    ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राहुलकुमार पवार, पो.उ.नि. कृष्णा घायाळ तसेच पोलीस कर्मचारी संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील व हरीश परदेशी यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    वाकोद परिसरातील महामार्गावर भरधाव ट्रक पलटला !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.