Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एरंडोल शहरात खळबळ : मारहाणीत जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
    एरंडोल

    एरंडोल शहरात खळबळ : मारहाणीत जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskMay 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दुचाकी लावण्याच्या शुल्लक कारणाने किरकोळ वाद होवून एरंडोल शहरातील गाढवे गल्लीत राहणाऱ्या अमोल कैलास पाटील (वय ३४) या तरूणाला बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला आहे. यावेळी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

    सविस्तर वृत्त असे कि, एरंडोल शहरातील गाढवे गल्लीत अमोल पाटील हा परिवारासह वास्तव्याला असून दि.२५ मे रोजीच्या सायंकाळी मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून त्यांच्या घराशेजारी राहणारे तुकाराम उर्फ आप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील, दीपक (गोल्या) नामदेव पाटील आणि उषाबाई तुकाराम पाटील रा. गाढवे गल्ली, एरंडोल, यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी शिवीगाळ व धमकी देवून मारहाण करण्यास सुरूवात केली. तर यातील संशयित आरोपी आशिष याने पाय पकडून उचलुन रस्त्यावरील सिमेंटरच्या रस्त्यावर आपल्याने अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत केली. तर इतरांनी लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी पाठीवर व पोटावर मारहाण केली. या जखमी अवस्थेत अमोल याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी २८ मे रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान सर्व आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल होवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.