Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बस व दुचाकीचा भीषण अपघात : महिला ठार तर पती गंभीर
    अमळनेर

    बस व दुचाकीचा भीषण अपघात : महिला ठार तर पती गंभीर

    editor deskBy editor deskJanuary 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील मंगरूळ शिवारात धुळे रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कूलजवळ एसटी बस व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील खडके येथील महिला जागीच ठार तर त्यांचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना २१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. अरुणाबाई समाधान राजपूत (वय ४९) असे मयत महिलेचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान, खडके येथील अरुणाबाई राजपूत व त्यांचे पती समाधान रुपसिंग राजपुत हे दुचाकीने अमळनेरकडून खडके येथे जात होते. मंगरुळ जवळील सेंट मेरी हायस्कूलजवळ समोरून येणाऱ्या कल्याण ते रावेर एसटी बसने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अरुणाबाई राजपूत या जागीच ठार झाल्यात. तर समाधान राजपूत हे गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाऊंडेशनमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी व त्यानंतर पोलिसांत धाव घेऊन एसटी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.