Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहिणीच्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच कुसुंब्यात दुर्दैवी घटना; तरुणाचा मृत्यू
    क्राईम

    बहिणीच्या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच कुसुंब्यात दुर्दैवी घटना; तरुणाचा मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    बहिणीचा वाढदिवस असल्याने तिला पैसे देऊन कपडे घेण्यासाठी पाठवून हितेश संदीप कोळी (वय १९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारे हितेश कोळी चटई कंपनीत कामाला होते. हितेश कोळी याच्या बहिणीचा ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असल्याने त्याने तिला पैसे दिले. तसेच बहीण व आईला कपडे घेण्यासाठी पाठविले. त्या वेळी घरी एकटाच असताना या तरुणाने गळफास घेतला. रात्री आई व बहीण घरी आले तेव्हा ही घटना लक्षात आली. त्या वेळी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना घडली त्या वेळी तरुणाचे वडील नाशिक येथे गेलेले होते. मयताच्या पश्चात आई, वडील, बहीण, लहान भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वणी गडावर जाण्याचे नियोजन, पण त्याआधीच आसोद्यात दुर्दैवी घटना!

    October 12, 2026

    जळगाव आणि पाचोऱ्यात रेल्वे दलालांवर कारवाई; तीन मोबाइलसह तिकिटांचा साठा जप्त

    October 12, 2026

    अलिशान कारमध्ये दरोडेखोरांचा दबा : कट्टे, कोयते अन् मिरची पावडर; पाच जण जेरबंद !

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.