Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अंगणवाडीतील पोषण आहारात पांढऱ्या अळ्या : पालकांचा संताप !
    क्राईम

    अंगणवाडीतील पोषण आहारात पांढऱ्या अळ्या : पालकांचा संताप !

    editor deskBy editor deskDecember 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    येथील सुतार वाड्यातील शहरी विभागाच्या ७६ क्रमांकाच्या अंगणवाडीतील पोषण आहारात बारीक पांढऱ्या अळ्या निघाल्याने संतप्त पालकांनी अंगणवाडी सेविकेस जाब विचारला. संतप्त नागरिकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी, भुसावळ यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी अंगणवाडीस भेट दिली. पंचनामा केला असून संबंधित ठेकेदार व पुरवठादारावर दोन दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, येथील सुतार वाड्यात असलेल्या ७६ क्रमांकाच्या शहरी अंगणवाडीमधील पोषण आहार अंतर्गत देण्यात आलेल्या वरणामध्ये पांढऱ्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संतप्त पालकांनी बुधवारी अंगणवाडीत जात सेविकेस जाब विचारत धारेवर धरले. दरम्यान, पालकांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तत्काळ अंगणवाडीस भेट देत बालविकास प्रकल्प अधिकारी यांना घटनेची दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार भुसावळ विभागीय शहरी अंगणवाडीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी व पर्यवेक्षिका प्रमिला पावरा यांनी भेट देत अंगणवाडीस पुरवलेल्या पोषण आहाराचा पंचनामा केला आहे. अंगणवाडीचा पोषण आहार कोणी शिजवला याचे उत्तर देताना वारंवार सेविका वेगवेगळे नाव सांगत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसात चौकशी करून संबंधित ठेकेदार व पुरवठादार यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पालकांना दिले आहे.

    तक्रारकर्त्यांमध्ये बाळा कोळी, आकाश चोपडे, संजय नन्नवरे, चेतन आढळकर, दत्तात्रय कोळी, योगिता कोळी, माया कोळी, पुंडलिक बारी यांचा समावेश होता. अंगणवाडी पोषण आहारासंदर्भात दोन दिवसात कारवाई न केल्यास पालकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.