Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दुचाकीचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू तर पाच जखमी
    क्राईम

    दोन दुचाकीचा भीषण अपघात : मुलाचा मृत्यू तर पाच जखमी

    editor deskBy editor deskDecember 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जखमी झालेल्या गारखेडा येथील अल्पवयीन मुलाचा जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. अपघाताची घटना सोमवारी सायंकाळी गारखेडा-धरणगाव रस्त्यावर घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मित्राचा वाढदिवस असल्याने प्रथमेश सुधाकर पाटील (गारखेडे), तसेच वैभव विठ्ठल देशमुख (अनोरे), हितेश भगवान भोई (अनोरे), शिवराज पंकज पाटील (गारखेडे) हे इयत्ता नववीत शिकणारे चौघे मित्र धरणगाव येथे केक घेण्यासाठी दुचाकी क्रमांक एम.एच.१९, बी.सी. ८३५५ ने धरणगावकडे निघाले होते. त्यांची धडक समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच. १९, ए.बी. ७०९८ सोबत झाली. या दुचाकीवरून शेखर जितेंद्र महाजन (१९) आणि गायत्री जितेंद्र महाजन (२८) हे भाऊ-बहीण अनोरेकडे जात होते.

    या अपघातात प्रथमेश पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान जळगाव येथे मृत्यू झाला. त्याच्यावर गारखेडा येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर पाच जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. धरणगाव पोलिसात अद्याप घटनेची नोंद करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.