Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश
    जळगाव

    सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

    editor deskBy editor deskOctober 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

    भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देऊन वार्ड क्रमांक १९ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील तरुण हर्षल आमोदे, सौरभ दांडगे, नरेश मराठे, मोहित मोरे, गौरव पाटील, पवन पाटील, संकेत लाड, विशाल सरोदे, आकाश मोरे, विवेक पवने, कृष्णा साबळे, यश मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचा गमछा त्यांच्या गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.

    यावेळी आ. राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, सुनील सरोदे, विठ्ठल पाटील उपस्थित होते. प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी काळात आमदार राजूमामा भोळे यांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.