Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    चौथ्या मजल्यावरून पडल्याने तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वडील दरवाजा बंद करून प्रचाराला गेल्याने घरात बंद असलेल्या मुलीने गॅलरीला साडी बांधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात चौथ्या मजल्यावरून पडल्याने प्रेरणा विजय गजरे (वय १९, मूळ रा. यावल, ह.मु, मुंदडानगर, जळगाव) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली.

    रामानंदनगरातील शंभर फुटी रस्त्याला लागून असलेल्या मुंदडानगरातील साई लक्ष अपार्टमेंटमध्ये विजय गजरे हे मुलगी प्रेरणा हिच्यासह काही दिवसांपूर्वीच वास्तव्याला आले होते. ते मूळचे यावलचे असून माजी नगरसेवक आहेत. मंगळवारी अमळनेर येथे उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. प्रेरणा ही मतिमंद असल्याने घरातून कुठेही निघून जाते म्हणून बाहेर जाताना त्यांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. प्रेरणा हिने दरवाजा ठोठावला. मात्र, उघडला नाही. तेव्हा गॅलरीतून साडी बांधून उतरण्याचा प्रयत्न केला असता त्यात ती कोसळली. डोक्याला जबर मार लागून अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. गजरे यांची लहान मुलगी दिव्या आईकडे, तर मोठी मुलगी प्रेरणा वडिलांकडे राहत होती. गजरे यांचे यावल येथे रेशन दुकान आहे. काही दिवसांपूर्वीच ते जळगावात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.