Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती
    क्राईम

    पळून जाण्यासाठी चोरट्यांनी उडी मारली मात्र लागला पोलिसांच्या हाती

    editor deskBy editor deskOctober 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चोरीचा प्रयत्न करीत असताना घरातील सदस्यांना जाग आल्याने पळून जाण्यासाठी शहाकुब शेख ताजोद्दीन (२२, रा. कासमवाडी) याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली, मात्र दुखापत झाल्याने पळता आले नाही व तो पोलिसांच्या हाती लागला. हा प्रकार रविवारी पहाटे गणेशवाडी परिसरात घडला. या प्रकरणी शहाकूबविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वेल्डिंग वर्कशॉपचे संचालक असलेले चेतन अशोक डहाके हे गणेशवाडी परिसरात राहतात. शनिवारी रात्री घरात झोपलेले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना कोणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्याने तेथून पळून जाण्यासाठी पहिल्या मजल्यावर उडी मारली. त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पळून जाता आले नाही. मात्र त्याच्यासोबत असलेला साथीदार मात्र तेथून पळून गेला. आरडाओरडचा ऐकल्याने परिसरातील नागरिक त्यांच्या घराकडे गेले. यावेळी डहाके यांच्या शेजारी असलेला घराच्या कम्पाउंडमध्ये शहाकुब शेख ताजोद्दीन हा लपून बसला होता. यावेळी नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.