Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी पकडले
    क्राईम

    गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी पकडले

    editor deskBy editor deskOctober 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल सिंधू गार्डन समोरील रस्त्यावर अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे वाहन धरणगाव पोलिसांनी १६ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करुन पकडले आहे. पोलिसांनी हे वाहन जप्त केले असून तीन गायींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दुपारी २ वाजता तिघांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावपासून जवळच असलेल्या हॉटेल सिंधू गार्डन समोरील रस्त्यावरुन गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री ९ वाजता कारवाई करुन वाहन (एमएच- २८, बीबी- ४७१३) वर कारवाई केली. कारवाई केल्यानंतर पोलिसांनी वाहन जप्त केले असून ३ गायींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नागराज साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादाराव बाबुराव अहिरे (वय ३५), विजय राजू सूर्यवंशी (वय २८) आणि नितीन पाटील (तिन्ही रा. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक उमेश पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.